Protest sakal
नाशिक

Onion Farmers Protest : अघोषित निर्यातबंदी विरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

Onion Farmers Protest : कांदा दरातील सततच्या घसरणीमुळे गेले वर्षभर उत्पादक शेतकरी अश्रू ढाळत होता. खर्चही निघत नसल्याने कांदा मातीमोल विकावा लागत होता, तेव्हा केंद्र सरकार कुठे गेले होते? आता जेमतेम खर्च निघेल एवढाच दर मिळत असताना दहाच दिवसांत निर्यातशुल्क वाढवून केंद्राने त्यावरही पाणी फिरविले आहे.

ही अघोषित निर्यातबंदीच असून, जोपर्यंत शुल्कवाढ मागे घेतली जात नाही तोपर्यंत कांदा लिलाव बंदच राहतील, असा सणसणीत इशारा सोमवारी (ता. २१) जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला.

केंद्राच्या घोषणेच्या निषेधार्थ सोमवारी जिल्हाभर रास्ता रोको, ठिय्या आंदोलन आणि घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांनी आंदोलनाची धार वाढविली आहे. दरम्यान, लिलाव बंद राहिल्याने कांदा खरेदी-विक्रीचे सुमारे चाळीस कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. (Onion Farmers Protest against increase in onion export duty nashik news)

कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क वाढीमुळे परदेशात कांदाचे दर वधारले आहेत. मात्र त्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. सर्वांत मोठी बाजार समिती असलेल्या लासलगावमध्ये आज कांदा विक्री होऊ शकली नाही. दुसऱ्या क्रमांकाच्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांदा लिलावादरम्यान शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करून केंद्राचा निषेध केला. शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून बाजार समितीचे आवार दणाणून सोडले.

येवला येथे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत ३०० ते ४०० रुपये दराने विकला, तेव्हा सरकार झोपले होते का? आता दोन रुपये मिळू लागताच निर्यात मूल्यात वाढ करून शेतकऱ्यांना संकटाच्या खाईत लोटले आहे, असा आरोप करीत शेतकरी संघटनेतर्फे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. निफाड येथे शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रांत कार्यालयावर धडक देऊन घोषणाबाजी करण्यात आली.

विंचूर (ता. निफाड) येथेही महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रास्ता रोको करीत तीव्र संताप व्यक्त केला. देवगाव (ता. निफाड) येथे शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्यातशुल्क वाढीच्या निर्णयाच्या अध्यादेशाची होळी केली. वणी (ता. दिंडोरी), चांदवडसह बागलाण तालुक्यातही आंदोलने करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

केंद्राने ४० टक्के निर्यातशुल्कचा घेतलेला निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी आमदार, तथा पिंपळगाव बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आदींकडे पत्राद्वारे केली.

लासलगावात कोटीचे व्यवहार ठप्प

कांद्याचे लिलाव न झाल्याने आशिया खंडातील कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीचे फक्त कांद्याचे पाच कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. जिल्ह्यातील पंधरा बाजार समित्यांनी ४० टक्के निर्यात शुल्क मागे घेण्यासाठी सोमवारपासून बेमुदत बंद पुकारला आहे.

लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली. श्री. मुंडे यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना बाजार समितीच्या सभापतींची तातडीची बैठक मंगळवारी (ता. २२) बोलावली आहे. केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशीही मुंडे यांनी चर्चा केली असून, तत्काळ लक्ष घालून कांदाप्रश्न सोडविण्यासंदर्भात विनंती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT