Onion esakal
नाशिक

Nashik Onion Export Ban : निर्यातबंदी उठणारच्या चर्चेने कांदा आवक घटली

केंद्र शासनाने ८ डिसेंबरला कांदा निर्यातबंदी जाहीर केल्यापासून बाजारात कांद्याचे दर घसरले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion Export Ban : केंद्र शासनाने ८ डिसेंबरला कांदा निर्यातबंदी जाहीर केल्यापासून बाजारात कांद्याचे दर घसरले आहेत. दर आणखी घसरू नयेत म्हणून गेल्या तीन आठवड्यांपासून विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याची जम्बो आवक सुरू होती.

मिळेल त्या भावात शेतकरी कांदा विक्री करीत होते. (Onion imports decreased due to talk of lifting export ban nashik news)

तीन दिवसांच्या सुटीनंतर मंगळवारी (ता. २६) बाजार सुरू झाल्यानंतर विक्रमी आवक वाढण्याची शक्यता होती. मात्र प्रत्यक्षात सलग दोन दिवस कांद्याची आवक घटली. कांदा निर्यातबंदी मागे घेतली जाणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे. या संदर्भात अफवा पसरविण्यात आल्यामुळे आवक घटल्याचे काहींचे मत आहे.

तालुक्यासह कसमादेत सप्टेंबर ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कांद्याला चांगला भाव मिळत होता. दिवाळीनंतर नवीन लाल कांद्याचा भाव चार हजार ३०० रुपये क्विंटलपर्यंत गेला होता. उन्हाळ कांद्याचा सरासरी बाजारभाव तीन हजार रुपये, तर लाल कांद्याचा सरासरी बाजारभाव साडेतीन हजार रुपये होता.

डिसेंबरअखेर कांदा पाच हजारांवर जाईल, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात होता. केंद्र शासनाने ८ डिसेंबरला अचानक कांदा निर्यातबंदी केल्यानंतर भाव ३० ते ४० टक्क्यांनी घसरले. उत्पादक व शेतकरी संघटनांनी आंदोलन करत निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी केली. तीन आठवडे झाले तरीदेखील या संदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही.

पावसाळी व लेट खरीप अशा दोन्ही हंगामांतील कांदे बाजारात येत होते. निर्यातबंदी मागे घेण्याची चिन्हे दिसत नसताना व भाव आणखी कमी होऊ नयेत हा दृष्टिकोन समोर ठेवून जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शुक्रवार (ता. २२)पर्यंत लक्षणीय आवक होती. शनिवारी व रविवारी बाजार बंद होता.

सोमवारी (ता. २५) ख्रिसमसची सुटी होती. तीन दिवसांच्या सुटीनंतर बाजारात लक्षणीय आवक वाढेल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र मंगळवारी व बुधवारी आवक कमी झाली. येथील बाजार समितीच्या मुंगसे बाजारात मंगळवारी ७०५ वाहनांतून ११ हजार क्विंटल, तर बुधवारी ७७४ वाहनांतून १२ हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी आला.

आवकमध्ये जवळपास निम्म्याने घट झाली. सर्वसाधारण बाजारभाव एक हजार ४०० ते एक हजार ५०० रुपयांदरम्यान होता. केंद्र शासन १ जानेवारीला निर्यातबंदी मागे घेणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तसेच या संदर्भात अफवादेखील पसरविल्या जात आहेत.

निर्यातबंदी मागे झाल्यास कांद्याला चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणताना हात आखडता घेतल्याचे बोलले जात आहे. कांदा निर्यातबंदी मागे घेण्यासंदर्भात लोकप्रतिनिधी व शेतकरी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही.

''तीन दिवसांच्या सुटीनंतर बाजारात आवक वाढणे अपेक्षित होते. उन्हाळी संपत आला असला तरी नवीन कांदा शेतकऱ्यांकडे आहे. निर्यातबंदी मागे घेण्यात येणार असल्याच्या बातमीची जुनी क्लीप सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. कदाचित त्यामुळेच आवक घटली असावी.

उत्तर महाराष्ट्रातील सर्व सहा खासदारांनी आपली ताकद पणाला लावून केंद्र शासनाला कांदा निर्यातबंदी मागे घेण्यास भाग पाडावे. विद्यमान व भविष्यात कांद्याचे मोठे उत्पन्न अपेक्षित आहे. कांद्यावरच शेतकऱ्यांचे भवितव्य आहे. शासनाने शेतकऱ्यांचा अंत न पाहता तत्काळ कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी.''- कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT