सिन्नर (जि. नाशिक) : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व उपबाजार नांदूरशिंगोटे, दोडी बु॥, पांढुर्ली, नायगाव, वडांगळी व वावी येथे सोमवार (ता. २४)पासून सुरू होणार असल्याची माहिती सभापती लक्ष्मणराव शेळके, उपसभापती संजय खैरनार व सचिव विजय विखे यांनी दिली. (Onion market starts in Sinnar taluka from Monday)
शेतकऱ्यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन
कोरोनाचा प्रादुर्भाव(Corona virus) टाळण्यासाठी सिन्नर येथील मुख्य बाजार आवारात कांदा लिलाव दर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार व शुक्रवारी, नांदूरशिंगोटे उपबाजार येथे दर सोमवार व शुक्रवारी, दोडी बु॥ उपबाजारात बुधवार, नायगाव येथे सोमवार ते शुक्रवार व वडांगळी येथे सोमवार ते शुक्रवार याप्रमाणे शेतमालाचे लिलाव सुरू करण्यात येत आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बाजार आवारात पिक-अप(Pick-Up) ५० व ट्रॅक्टर(Tractor) शंभर अशा एकूण १५० वाहनांचेच दिलेल्या टोकणप्रमाणे लिलाव होणार असल्याने कांदा विक्रीस आणताना एक दिवस आधी शेतकरीबांधवांनी प्रथम आरटीपीसीआर (RT-PCR)किंवा रॅपिड (Rapid Antigen) चाचणी करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर टोकण घेऊनच कांदा विक्रीसाठी आणावयाचा आहे. बाजार आवारात येताना केवळ दोन व्यक्तींनाच (वाहनचालकDriver व शेतकरीFarmer) कोरोना चाचणी निगेटिव्ह(Corona Negative) असल्याचा दाखला बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर दाखवून प्रवेश दिला जाणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.