Onion News esakal
नाशिक

Nashik Onion Rate : पाककडून कांदा निर्यातमूल्य 220 डॉलर; नाशिकमध्ये कांद्याच्या दरात 'इतक्या' रुपयांची वाढ

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion Rate : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क ४० टक्के लागू केल्यानंतर पाकिस्तानने कांद्याचे निर्यातमूल्य टनाला ५५ डॉलरने वाढवून ते २२० डॉलर केले. त्यामुळे मलेशियामध्ये पाकिस्तानचा कांदा ३२० डॉलरमध्ये पोचत असला, तरीही ४० टक्के निर्यात शुल्कामुळे भारतीय कांद्याच्या मलेशियातील निर्यातीचा भाव ५२० डॉलरपर्यंत पोचला आहे.

पाकिस्तानच्या कांद्याने आखाती देशातील बाजारपेठ काबीज केल्याने भारतीय कांद्यासाठी बांगलादेश आणि श्रीलंकेमधील बाजारपेठेची आशा होती.

मात्र त्यातच बांगलादेश आणि श्रीलंकेतील व्यापाऱ्यांनी चीन, पाकिस्तान, इराण, इजिप्तमधून कांद्याची मागणी नोंदवली आहे. (Onion price hike in Nashik by Rs 80 to 400 news)

हा कांदा बांगलादेश आणि श्रीलंकेत पोचण्यासाठी आणखी किमान दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत बांगलादेश आणि श्रीलंकेत भारतीय कांद्याला मागणी राहील, असे निर्यातदारांचे म्हणणे आहे.

श्रीलंकेत आठवड्याला २०० कंटेनरभर कांद्याची निर्यात व्हायची. ती आता ३० ते ४० कंटेनरपर्यंत कमी झाली आहे. बांगलादेशसाठी दिवसाला दीडशे ते दोनशे ट्रकभर कांदा पाठवला जात होता. आता पन्नास ते साठ ट्रकभर कांदा जात आहे.

बांगलादेश आणि श्रीलंकेत मागवण्यात आलेल्या इतर देशांतील कांदा पोचल्यावर तेथील ग्राहकांकडून त्यास कसा प्रतिसाद मिळतो, यावर भारतीय कांद्याची मागणी पंधरा दिवसांनंतर स्पष्ट होईल, असे निर्यातदार सांगतात. दरम्यान, कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यात सोमवारच्या (ता. २८) तुलनेत गुरुवारी कांद्याच्या भावात क्विंटलला सरासरी ८० ते ४०० रुपयांची वाढ झाली.

राज्यातील कांद्याचे भाव

राज्यातील बाजारपेठांमध्ये गुरुवारी (ता. ३१) विकलेल्या कांद्याला क्विंटलला सरासरी मिळालेला भाव रुपयांमध्ये असा : कोल्हापूर- १ हजार ६००, मुंबई- १ हजार ५५०, खेड-चाकण- १ हजार ८००, नागपूर- २ हजार २५०, पुणे- १ हजार ७००, लोणंद- १ हजार ९००, कोपरगाव- २ हजार १५०.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नाशिक जिल्ह्यातील तुलनात्मक भाव

(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये)

बाजारपेठेचे नाव गुरुवारी (ता. ३१) सोमवारी (ता. २८)

येवला २ हजार १ हजार ९००

लासलगाव २ हजार १०० २ हजार

विंचूर २ हजार ३०० २ हजार

मुंगसे २ हजार १२५ २ हजार

नायगाव-सिन्नर २ हजार २५० १ हजार ८५०

कळवण १ हजार ९५१ १ हजार ९००

चांदवड २ हजार १०० १ हजार ८८०

मनमाड २ हजार १ हजार ९२०

पिंपळगाव बसवंत २ हजार ३०० २ हजार

देवळा २ हजार १०० २ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT