Nashik Onion News : कांदा निर्यातबंदीचा निर्णय होऊन महिना उलटला असून, कांद्याचे दर दोन हजार रुपयांच्या आत आले आहेत. त्यामुळे नाशिकमधील शेतकरी संघटनांनी ८ जानेवारीपासून बाजार समित्या बंदचा निर्णय घेतला आहे.
परिणामी, बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद राहण्याच्या भीतीने आवक अजून वाढल्याने दर घसरत चालले आहेत.(Onion price within 2 thousand in nashik news)
बाजार समित्यांमध्ये सध्या लाल कांद्याची हजार क्विंटल आवक होते. यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने दरातील घसरण कायम आहे. केंद्र सरकारने ७ डिसेंबरला कांद्यावर निर्यातबंदी लागू केली. त्यानंतर कांद्याच्या दरात सुरू झालेली घसरण अजूनही थांबलेली नाही.
याविरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून, त्यांनी बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला कस प्रतिसाद मिळतो, हे पुढील आठवड्यात कळेल. परंतु, तत्पूर्वी कांद्याची आवक वाढतच असल्याने दरातील घसरण थांबायला तयार नाही.
‘एनसीसीएफ’विरोधात असंतोष
कांदा निर्यातबंदीनंतर शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष कमी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ अर्थात ‘एनसीसीएफ’ने तातडीने तीन हजार रुपये क्विंटल दराने कांदा खरेदीला सुरवात केली आहे. जिल्ह्यातील १२ केंद्रांवर लाल कांद्याची खरेदी होत आहे. या विरोधातही शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष दिसून येतो.
कांद्याचे किमान-कमाल दर व सरासरी
लासलगाव- १११२ ते २०३० : १९५०
येवला- ५०० ते २००० : १८००
मालेगाव- ७०० ते २०८२ : १९००
सिन्नर- ५०० ते १९५० : १८५०
चांदवड- १००० ते २१६५ : २०५०
मनमाड- ५०० ते १९२३ : १७५०
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.