Inflow of Onion taking place in Agriculture Produce Market Committee.  esakal
नाशिक

Onion Rate Hike : जुलै- ऑगस्टमध्ये कांदा भाव खाणार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सध्या वाढलेल्या तापमानामुळे कांद्याची प्रतवारी खालावली असून चाळीत कांदा सडण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी सध्या हाच कांदा विकायला आणत असल्याने कमी भाव मिळत आहे. या दरातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे. (Onion prices are likely to hike in July due to decline in domestic production nashik news)

येथील बाजार समितीत सध्या कांद्याला सरासरी साडेसातशेचा दर मिळत असल्याने शेतकरी निराश झाला आहे. हा कांदा वाचावायचा कसा या विवंचनेत तो सध्या आहे. दुसरीकडे देशांतर्गत उत्पादन घटल्याने जुलैमध्ये कांद्याचे दर तेजीत राहण्याची शक्यता येथील व्यापारी वर्तुळातून व्यक्त होत आहे.

कांदा सडण्याचे प्रमाण लक्षात घेता आणि बाजार समितीत येणारी प्रचंड आवक बघता जुलै- ऑगस्टमध्ये कांदा तेजीत येऊ शकतो. या पावसाचा फटका महाराष्ट्र राज्याबरोबर मध्यप्रदेशलाही बसला आहे. मध्यप्रदेशमध्ये पावसाने कांद्याचे २५ ते ३० टक्के नुकसान झाले आहे.

मध्यप्रदेशतून कांदा निर्यात होत नव्हती, मात्र भारतीय बाजाराची गरज तो भागवत होता. याच कांद्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून नाशिकच्या कांदा दरावर परिणाम झाला आहे. मात्र यंदा मध्यप्रदेशमधून २५ टक्के उत्पादन घटल्याने देशासह परदेशात राज्याच्या कांद्याला मागणी वाढेल आणि जुलै आणि ऑगस्टमध्ये कांदा तेजीत राहण्याची शक्यता असल्याचे कांदा निर्यातदार विकास सिंग यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सध्या आशिया खंडातील प्रमुख बाजार समिती असलेल्या लासलगावमध्ये कांदा ४ ते १२ रुपये प्रति किलोने विक्री होत आहे. आपल्यापेक्षा कमी दरात आखाती देशाला पाकिस्तान कांदा देत आहे. या हंगामात पाकिस्तानमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असून मलेशिया आणि आखाती देशातून पाकिस्तानी कांद्याला मागणी वाढली आहे.

दुसरीकडे इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानचे वातावरण बिघडल्याने डॉलर अस्थिर झाला आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तानचा कांदा आणखी स्वस्त मिळत असल्याने त्यांच्या कांद्याची मागणी वाढत आहे. याचा फटका आपल्याला बसत आहे.

निवडणुकांमुळे पुन्हा फटका शक्य

पुढील महिन्यात नाफेडही कांदा खरेदी करण्यास सुरवात करेल तर पुढीलवर्षी २०२४ च्या लोकसभा निवडणुका जाहीर होणार असल्याने केंद्र सरकार कांद्याला खूप काही तेजीत जाऊ देईल असे वाटत नाही. त्यामुळे पुन्हा ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवून कांदा दर स्थिर करण्यासाठी प्रयत्न होतील. याचा फटका मात्र कांदा उत्पादकाना बसेल अशी शक्यता आहे.

याचा परिणाम सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत शासनस्तरावर नाफेडमार्फत कांदा खरेदी केल्यास या बफर स्टाकचा वापर कांद्याच्या टंचाईच्या काळात करता येईल.

याचे शासन स्तरावर नियोजन होणे गरजेचे आहे. कांद्याचे झालेले राज्यनिहाय नुकसान व संपूर्ण नुकसानीची माहिती संकलित करून त्यावर उपाययोजना केल्यास थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

देठातून पाणी गेल्याचा परिणाम

उन्हाळ कांदा हा शेतकऱ्यामार्फत चाळीस साठवला जातो. हा कांदा डिसेंबरपर्यंत चालतो. अवकाळी पाऊस, गारा, उष्णता याने कांदा खराब होऊ लागल्याने टिकवन क्षमता कमी झाली आहे. गारांच्या पावसाने कांद्याच्या देठातून पाणी आत गेल्याने व प्रचंड उष्णतेमुळे कांदा काळा पडू लागला आहे. पाणी सोडू लागला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चाळीच्या- चाळी याच्यामुळे बसून गेल्या आहे.

लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची १५ हजार क्विंटल आवक होण्याची शक्यता आहे. कांद्याला किमान ४००, कमाल १२९० तर सरासरी ७५० रुपये दर जाहीर झाला. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१७) ७८९ वाहनातून पंधरा हजार क्विंटल कांदा कमीत कमी ४००, जास्तीत जास्त ११९० तर सरासरी ७५० रुपये दर मिळाला.

"वातावरणातील बदलामुळे कांद्याची प्रत खराब होत आहे. चाळीत कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने कांदा आवक मोठ्या प्रमाणात विक्रीस येत आहे. आवक जास्त आणि गुणवत्ता काही प्रमाणात खालावल्याने कांदा भाव हे कमी दिसत आहे." - विकाससिंग, कांदा निर्यातदार, नाशिक.

"कांदा लागवडीपासून चाळीत कांदा भरेपर्यंत बक्कळ मोठा खर्च झाला आहे, परंतु मागे झालेल्या अवकाळी पावसाने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. चाळीत भरणे व पुन्हा विक्रीसाठी चाळीतून बाहेर काढणे डबल खर्च झाल्याने उत्पादन खर्चही निघत नाही." - चंद्रभान ओझरकर, आंबेगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT