onion prices began to rise preparations for onion sale have started  Sakal
नाशिक

नाशिक : भाव वधारू लागल्याने चाळीतला कांद्याची निवडानिवड सुरू

प्रमोद सावंत

येसगाव (जि. नाशिक) : उन्हाळ भगवा कांद्याला रास्त भाव नसल्याने अद्यापपर्यंत कांद्याची साठवणूक चाळीत केली होती. मध्यंतरी भाव कोसळल्याने भाववाढीच्या प्रतीक्षेत मात्र भाव घसरत राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न धुळीस मिळाले. शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी काढला नव्हता. गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी मेहनतीने उन्हाळ भगवा कांद्याचे पीक उभे केले. हवामान प्रतिकूल राहिल्याने काही भागातून उत्पादनात घट आली. शिवाय मध्यंतरी बेमोसमी पावसामुळे कांद्याचे अतोनात नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले. बिकट परिस्थितीत भाववाढीच्या आशेवर चाळीत साठवून ठेवला कांदा ऊन, पाऊस वातावरणामुळे सडण्यास सुरवात झाल्यामुळे बळीराजाला नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

कांद्यासाठी शेतकरी सोसायटी, बँक, विविध पतसंस्थेकडून, खासगी कर्ज उचलतो. कांद्याला योग्य भाव नसल्यामुळे कर्जे, बिले, घर-परिवार खर्च कसा करावा, ही विवंचना वाढली आहे. काही दिवसांपासून भाववाढ झाल्याने शेतकरी चाळीतील खराब कांदा निवडून चांगल्या कांद्याची प्रत बाजूला करून तो विक्रीसाठी तयार करण्यासाठी लगीनघाई करीत आहे. मोठ्या प्रमाणावर कांदा खराब झाल्याने कांदा निवडण्यासाठी मजुरीचा अतिरिक्त खर्च वाढला आहे. कांद्याला चांगला भाव टिकून राहावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. कांदा सडू लागल्याने मिळेल त्या भावात विक्रीसाठी काढला जात आहे.

कांदाचाळीत सात ट्रॅक्टर भगवा कांदा साठविला होता. उत्पादनखर्च निघण्याएवढा भाव नसल्यामुळे कांदा विक्रीसाठी काढला नाही. थोडाफार भाव वाढल्यानंतर कांदा विक्रीसाठी काढला. दोन ट्रॅक्टर चांगला माल वगळता बाकीचा सर्व कांदा खराब झाला.
-संजय सूर्यवंशी, शेतकरी, येसगाव बुद्रुक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT