Onion auction going on in market committee on Friday.  
नाशिक

Nashik Onion Price Fall: कांद्याच्या दरात घसरण सुरूच; कांदा उत्पादक शेतकरी हतबल

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion Price Fall: बाजार समितीत लाल व उन्हाळी कांद्याच्या बाजारभावात सातत्याने घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यापासून कांद्याचे दर सातत्याने घसरत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी करीत असून, ही निर्यातबंदी तातडीने उठवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. (Onion prices continue to fall nashik news)

येथील बाजार समितीत निर्यातबंदीपूर्वी ७ डिसेंबरला लाल कांदा सरासरी ३,३६० रुपये प्रतिक्विंटल, तर उन्हाळ कांद्याचे ३,६०० रुपये प्रतिक्विंटल दर होते. उन्हाळ कांद्याच्या सरासरी दरात पुन्हा १३०० रुपयांची घसरण झाली, तर लाल कांद्याच्या सरासरी दरात १४१० रुपयांची घसरण झाली.

गुरुवारी (ता. १४) उन्हाळ कांद्याला सरासरी २३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, तर लाल कांद्याला सरासरी १९५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. केंद्राने निर्यातबंदीचा तडकाफडकी निर्णय घेतल्यानंतर रोजच कांद्याचे दर घसरत आहेत. लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये कांद्यांचे दर दररोज घसरत आहेत.

काही दिवसांपूर्वी लाल कांद्याला चार ते साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल समाधानकारक भाव मिळत असल्याने उरलेल्या कांदा विक्रीतून उत्पादन खर्च निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, केंद्र सरकारच्या एका निर्णयाने कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक कोंडीत सापडला आहे.

कांदा उत्पादक उद्धवस्त

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीबंदीचा निर्णयामुळे दर सातत्याने घसरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. येणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शहरी ग्राहकांची मते मिळविण्यासाठी केंद्र सरकारने शेतकरीविरोधी निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पूर्ण उद्धवस्त झाला आहे. केंद्र सरकारने तातडीने कांदा निर्यातबंदी उठवावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT