Onion sold in the market committee at lasalgaon esakal
नाशिक

Onion Prices Fall: कांद्याचे दर 50 टक्क्यांनी घसरले; अवघ्या 20 दिवसात किमतीत घट

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव (जि. नाशिक) : महागाईमुळे सर्वच वस्तूंचे दर वाढलेले असताना कांदा या पिकांचे दर घसरल्याने उत्पादकांमध्ये नाराजी पसरली आहे. १ नोव्हेंबर रोजी सरासरी २ हजार ५५१ रुपये प्रति क्विंटलने विक्री झालेला कांदा आज सरासरी १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलने विकण्याची वेळ कांदा उत्पादकांवर आलेली आहे. २० दिवसात कांद्याचे दर सुमारे ५० टक्क्यांनी घसरल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत अडकत आहे. चांगला दर मिळेल या अपेक्षेने साठविलेले उन्हाळी कांदा हा मोठ्या प्रमाणात खराब होत आहे. त्यात दर घसरल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. (Onion prices fall by 50 percent Price drop in just 20 days Nashik News)

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला ८ रुपये किलो पासून ते २ हजार रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. कांद्याचा कमी झाल्याने उत्पादन खर्चही निघणार नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत अडकला आहे. प्रचंड खर्च करून मेहनत नंतर शेतकरी यांच्यावर कवडी मोल दराने कांदा विकण्याची वेळ आली आहे.

कांदा पीक नगदी असले तरी ते जुगार सारखे झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनातही मोठी घट झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चाच्या निम्मेच उत्पन्न मिळत असल्याने कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. भाव असतो तेव्हा कांदा नसतो, तर कांदा असताना भाव मिळत नसल्याने दोन्ही बाजूने शेतकऱ्याची कोंडी झाली आहे.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांना दहा वर्षांपूर्वी मिळणार भाव आणि महागाईच्या काळात आज दिला जाणारा भाव सारखाच असल्याने तो हवालदिल होत आहे. तर दुसरीकडे उत्पादन खर्च वाढल्याने त्याचे आर्थिक गणितही कोलमडले आहे. दहा वर्षापूर्वी कांद्याला साधारण एकरी खर्च २० हजारांपर्यंत येत होता, तोच खर्च आज ७० हजारांपर्यंत गेला आहे. इंधन दरवाढीमुळे शेतीच्या उत्पादन खर्चात भरमसाट वाढ झाली आहे . रासायनिक खते, कीटकनाशक यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या तुलनेत शेतमालाचे दर वाढलेले नाही.

सरासरी कांद्याला असलेला भाव (प्रती क्विंटल)

१ नोव्हेंबर - २ हजार ५५१

५ नोव्हेंबर - २ हजार ४००

१० नोव्हेंबर - २ हजार

१७ नोव्हेंबर - १ हजार ६००

१९ नोव्हेंबर - १ हजार ५००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT