Water continued through drip irrigation for onion due to lack of water distribution. esakal
नाशिक

Nashik Onion Crop News: दुष्काळाच्या छायेत कांदालागवडीचा जुगार; जिल्ह्यात 53 हजार हेक्टरवर कांदा पीक

दुष्काळातही ५३ हजार हेक्टरवर रब्बी हंगामात (उन्हाळ) कांद्याची लागवड झाली असून, दीड लाखावर कांदा लागवडीचा आकडा जाणार आहे

संतोष विंचू

येवला : बाजारभावात कितीही मंदी असली, तरी जिल्ह्यातील शेतकरी कांद्याला कधीच विसरत नाही. आताही दुष्काळी परिस्थिती असतानाही उपलब्ध, तसेच कालवा व शेततळे पाण्याच्या आधारावर शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकांना बाय बाय करत उन्हाळ कांदा लागवडीचा पुन्हा जुगार खेळला आहे.

दुष्काळातही ५३ हजार हेक्टरवर रब्बी हंगामात (उन्हाळ) कांद्याची लागवड झाली असून, दीड लाखावर कांदा लागवडीचा आकडा जाणार आहे. (Onion production in Shadow of Drought Onion crop on 53 thousand hectares in district Nashik agriculture News)

एखादे वर्ष गेले तर जाऊ द्या, पण ज्या कांदा पिकाने दुष्काळी असूनही आपली स्वप्नपूर्ती केली. त्या कांदा पिकावर जिल्ह्याचा भरोसा आहे, म्हणून यंदा वर्षभर भावात अस्थिरता होती. बेभरवश्याचा भाव असूनही लागवडीवर मात्र कुठलाही परिणाम झाला नाही.

कांद्याने कितीही रडविले, तरी कधी तरी कसर काढत कांदाच हसवतो आणि नुकसानभरपाई करून देतो, असा नेहमीचा अनुभव झाल्यामुळे दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांदा प्रेम तसूभरही कमी झालेले नाही.

या वर्षी खरीप हंगामाने अर्ध्या जिल्ह्याला अब्जावधीच्या नुकसानीच्या झळा पोचविल्या. आजही सात ते आठ तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

एकीकडे अनेक तालुक्यात प्यायला पाणी नाही, इतकी जटील स्थिती असताना, दुष्काळातही शेतकऱ्यांनी पुढील हंगामात कांद्याला पुन्हा एकदा चांगला भाव मिळेल, या आशेवर रब्बी, उन्हाळ कांदालागवडीला प्राधान्य दिले आहे.

यासाठी शेतकऱ्यांनी खरिपाच्या पिकांना बळी देऊन त्याऐवजी कांद्याकडे मोर्चा वळवला आहे. किंबहुना ‘थेंब-थेंब’ पाणी या कांद्यासाठी काटकसरीने उपयोगात आणले जात आहे.

या पाण्यावर आहे आशावाद

लेट खरिपात रांगडा कांदा, तर रब्बीत उन्हाळ कांद्याची लागवड होते. विशेषत: दुष्काळी येवला, नांदगाव, मालेगाव, सिन्नर, देवळा तालुक्यांमध्ये डिसेंबरपासूनच उन्हाळची लागवड सुरू होते.

या उलट पाणीदार असलेल्या निफाड, दिंडोरी, कळवण आदी भागांत जानेवारीपर्यंत लागवड सुरू होते. या वर्षी शेतकऱ्यांनी रब्बीच्या गहू, हरभरा, मका पिकांना फाटा देत उपलब्ध पाण्यावर कांद्याची लागवड चालविली आहे.

सध्या भावाची हमी नसली, तरी चाळीत साठवलेल्या कांद्याला समाधानकारक भाव मिळेल, हा दुर्दम्य आशावाद शेतकऱ्यांकडे असल्याने लागवड जोरात सुरू आहे. विहिरी कूपनलिकांसह कालव्याची आवर्तने आणि शेतात भरलेली शेततळ्याच्या पाण्यावरच लागवड सुरू आहे.

दुष्काळी तालुके पुढे

जिल्ह्यात दरवर्षी सरासरी दोन लाख हेक्टरच्या आसपास रब्बी कांदालागवड होते आणि मागील वर्षी दोन लाख २१ हजार हेक्टरवर कांदालागवड झाली होती. या वर्षी क्षेत्रात मोठी घट होईल, अशी शक्यता वाटत असताना, आतापर्यंत तब्बल ५२ हजार ७८० हेक्टरवर लागवड झाली आहे. दुष्काळी तालुक्यातील लागवड आटोपली आहे. कसमादेसह निफाड भागातील लागवड सुरूच आहे.

दुष्काळी असलेल्या मालेगावात सर्वाधिक ७,६९६, येवल्यात ५, ७९८, नांदगावमध्ये ३,४७७, कळवणमध्ये ६,७२२, दिंडोरीत २,९१४, देवळ्यात ७,८३३, सटाण्यात ६, ८८५, चांदवडमध्ये ३,३२२, सिन्नरमध्ये ३,१२७, निफाडमध्ये ४,८२९ व नाशिकमध्ये १६५ हेक्टरवर मागील आठवड्यापर्यंत लागवड झाली आहे.

कांद्याचे पीक जगविण्यासाठी काही भागात टँकरचा, तर काही भागात तुषार सिंचनचा आधार घेतला जात आहे.

"आम्ही पालखेड कालव्याच्या भरवशावर कांदालागवड केली आहे. मात्र, वेळेत पाणी मिळत नाही. येवल्यातील लाभक्षेत्रातील शेतकरी गेल्या महिन्यापासून पाट पाण्याची वाट पाहत आहेत. पालखेडचे रोटेशन वेळेवर येईल, या आशेवर उन्हाळ कांदालागवड केली आहे. पीक जगविण्यासाठी पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना समान न्याय द्यावा."

-सोमोदय मढवई, शेतकरी, चिचोंडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT