निफाड : चार महिने धो-धो कोसळलेला पाऊस पूर्ण हंगामाचा झालेले नुकसान यातून मार्ग काढत असतानाच रब्बी हंगामाचे नियोजन करताना खास करून कांदा पिकासाठी मजुरांची टंचाई भासत आहे.
आता शेतकरी वर्गाने एकमेका करू साहाय्य या नीतीचा अवलंब करताना आडजी-पडजी पद्धतीने कांदा लागवड सुरू केली आहे. दरम्यान, निफाड तालुक्यात अकरा हजार १८८ हेक्टर क्षेत्रावर रब्बी कांद्याची लागवड झाली आहे.
द्राक्ष नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात कांदा पीक हे द्राक्षाच्या उत्पादन खर्चासाठी पूरक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. (Onion Production Update Use of adji-padji method in onion cultivation nashik news)
गेल्या काही वर्षांपासून बळिराजा अस्मानी सुलतानी संकटाशी झुंज देत आहे. अशा परिसरात वाढलेली महागाई आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्या यातून मार्ग काढण्याचा तो प्रयत्न करताना दिसत आहे. असे असताना मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील तसेच, बाहेरून आलेल्या मजुरांकडून कांदा लागवड करून घेतली जाते.
परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये कांदा लागवड करताना मजुरांचा संकटाचा सामना येथील बळिराजाला करावा लागत आहे. शेतकरी राजा कांदा लागवड करत असताना आपल्या शेतातील कांदा लागवड केल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तसेच, त्यांच्या महिलांना सोबत घेत आडजी-पडजी पद्धतीने नुसार आधी आपले नंतर त्यांचे कांदे लागवड करत मजूर टंचाईतून मार्ग काढताना दिसत आहे.
मजुरांना थेट दुसऱ्या तालुक्यातून वाहने पाठवून शेतापर्यंत आणले जाते मनासारखा भाव दिला जातो, मात्र तरीही मजूर मिळत नसल्याने बळिराजा मेटाकुटीला आला आहे. अशातूनच आपल्या पूर्वजांच्या संस्कारातून संकटाच्या काळात एकमेकाला सहकार्य करण्याची भूमिकेचे पुनरावृत्तीच आता निफाड तालुक्यात झाली आहे. त्यातून आता उन्हाळ कांद्याची लागवड निफाड तालुक्याच्या ग्रामीण भागात होतानाचे चित्र पाहायला मिळताना दिसत आहे.
"एकीकडे बेरोजगारांची संख्या वाढत आहे परंतु शेतकाम करण्यासाठी मजूर मिळत नाही त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून उन्हाळ कांद्याचा हंगाम लागवडीचा लेट होत आहे त्यामुळे बऱ्याच शेतकरी महिला. जवळपासच्या7/8 महिलांना एकत्र करून एकमेकींचे कांदे लावून घेतात त्यामुळे वेळेवर लागवड होते खर्चही वाचतो अशी आडजी-पडजी पद्धत रूढ होत आहे."
-शोभा साठे, कांदा उत्पादक शेतकरी
"मुळात कांद्याची लागवड वेळेवर नाही जर केली रोप खराब होऊन पूर्ण वर्षाची कमाई जाण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी रात्रीचा दिवस करून कांदा लागवडीकडे लक्ष देत आहे अशातच मजूर टंचाईचा सामना करावा लागत असल्याने आडजी-पडजी पद्धतीचा प्रयोग पुन्हा एकदा शेतकऱ्याला करावा लागत आहे."
-निवृती न्याहरकर,जिल्हा संपर्कप्रमुख, शेतकरी संघर्ष संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.