NAFED Onion Purchase : काही दिवसांपासून कांद्याचे दर सतत घसरत असून लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तातडीने कांद्याच्या भावात होणारी घसरण न थांबल्यास जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत लोटले जातील, त्यामुळे नाफेडने तातडीने कांदा खरेदी सुरू करावी अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी आज नाफेड प्रशासनाकडे केली.
त्यावर पुढील आठवड्यापासून कांदा खरेदी सुरू करण्यात येईल असे आश्वासन नाफेड प्रशासनाने दिल्याचे त्यांनी सांगितले. (Onion purchase by NAFED from next week MP Godse discussion with administration nashik news)
जिल्ह्यातील दहा बाजार समितीमध्ये कांद्याची चांगली आवक असूनही भाव मात्र समाधानकारक मिळत नाही. सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला कमीत कमी साडेतीनशे तर जास्तीत जास्त मुश्किलीने एक हजाराच्या आसपास भाव मिळत आहे.
आजमितीस शेतकऱ्यांना सरासरी साडेसहाशे रुपये इतकाच भाव मिळत आहे. लागवडीसाठीचा खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. यातून जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेत कांद्याच्या भाववाढीसाठी प्रयत्न करण्याची गळ घातली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
खासदार गोडसे यांनी पिंपळगाव येथील नाफेड कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव कमी का मिळतो, शेतकऱ्यांना अधिकचा भाव मिळण्यासाठी नेमकी काय भूमिका घ्यावी याविषयीचा आढावा खासदार गोडसेंनी नाफेडचे निखिल पठाडे यांच्याकडून घेतला.
शेतकऱ्यांना अधिकचा भाव मिळणे अत्यंत गरजेचे आहे. आज मिळणारा भाव असाच राहिल्यास कांदा उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जाईल. त्यामुळे कांद्याला जास्तीजास्त भावासाठी नाफेडने तातडीने कांदा खरेदी सुरू करावी अशा सूचना खासदार गोडसे यांनी नाफेड प्रशासनाला दिल्या.
दरम्यान, नाफेडमार्फत जिल्ह्यातील सुमारे ३ लाख टन कांदा खरेदी होणार असून पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष कांदा खरेदी सुरू करत असल्याचे नाफेडच्या सूत्रांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.