Onion News esakal
नाशिक

NAFED Onion Purchase : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये ‘नाफेड’कडून कांदा खरेदीला पाठ

सकाळ वृत्तसेवा

NAFED Onion Purchase : जिल्ह्यात पेटलेल्या कांदा आंदोलनात तोडगा निघण्याची अजूनही चिन्हे दिसत नाहीत. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिलेल्या सूचनांनुसार कांदा खरेदी सुरू आहे. मात्र, ‘नाफेड’ने कुठल्या बाजार समितीत कांदा खरेदी केला, याचे उत्तर मात्र गुलदस्त्यातच आहे.

देशात मागणी आणि पुरवठ्यात समन्वय राखत भावांचे व वस्तूंचे नियोजन करणाऱ्या केंद्र सरकारने ‘नाफेड’ला कांदा खरेदीतून समन्वयाचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार ‘नाफेड’कडून साधारण १३ केंद्रांवर कांदा खरेदी करीत बाजारात हस्तक्षेप केला जातो. (onion Purchase from NAFED at their center only nashik news)

कांदा बाजारात हस्तक्षेपांतर्गत कांद्याच्या देशांतर्गत स्थितीचा समतोल साधण्याच्या नावाखाली केंद्राने कांद्याच्या निर्यात शुल्कात घसघशीत ४० टक्के वाढ करीत विदेशात निर्यात होणाऱ्या कांद्यावर काही अंशी नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. निर्यात शुल्क वाढीमुळे अडचणीत आलेल्या कांदा व्यापाऱ्यांनी काही दिवस देशांतर्गत कांदा खरेदीत हात आखडता घेतल्याने त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला.

त्यातून जिल्ह्यातील कांदा खरेदीचे बाजार बंद पडले. शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले असतानाच ‘नाफेड’ने संचालकांना नाशिकला पाठविले. राष्ट्रीय उपभोक्ता परिषदेचे अध्यक्ष नाशिकला आले. शेतकऱ्यांच्या कांद्याला न्याय देण्यासाठी बाजार समित्यांत कांदा खरेदीची तयारी दर्शविली. प्रत्यक्षात मात्र ‘नाफेड’कडून त्यांच्या केंद्रावरच खरेदी सुरू आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दोन हजार ४०० भावाचा प्रश्न

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी प्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत दोन हजार ४०० रुपये दराने कांदा खरेदीचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी शर्मा यांनी गुरुवारी (ता. २४) सायंकाळी ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ला पत्र देत बाजार समितीत कांदा खरेदीच्या सूचना दिल्या. केंद्रीय आणि स्थानिक स्तरावरील या सगळ्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात कांद्याचा बाजार पूर्ववत सुरू होईल, अशी अपेक्षा होती.

‘नाफेड’ने कांदा खरेदी केल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र ‘नाफेड’ने शुक्रवारी (ता. २५) जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार कांदा खरेदी केला खरा; पण कुठल्या बाजार समितीत कांदा खरेदी केला, हे मात्र गुलदस्त्यातच आहे. वरकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन केल्याचे दाखविणाऱ्या ‘नाफेड’कडून प्रत्यक्ष खरेदीत दरासह बाजार समित्यांत खरेदीच्या सूचनांना वाटाण्याच्या अक्षदा लावल्या, असे आरोप शुक्रवारी शेतकऱ्यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Elections : महायुतीचं ठरलं! भाजप मोठा भाऊ, १५५ जागांवर लढणार? शिंदे-पवारांना 'इतक्या' जागा

IND vs NZ: भारताविरुद्ध लढण्यासाठी CSK ची कशी झाली मदत? शतकवीर रचिन रविंद्रने केला खुलासा

Latest Maharashtra News Updates Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत मुक्काम

Railway News: वांद्रे टर्मिनस ते लालकुवादरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन, या तारखे पासुन सुरु होणार आरक्षण

Kotak Mahindra Bank: कोटक महिंद्राची मोठी डील; 4,100 कोटींना खरेदी करणार परदेशी बँक, शेअर्स वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT