onion  esakal
नाशिक

Nashik Onion Purchase: फेडरेशनतर्फे जिल्ह्यात कांदा खरेदी सुरू

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion Purchase : नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) तर्फे राज्यात एक लाख टन कांदा खरेदी केला जाणार आहे.

फेडरेशनतर्फे गुरुवारी (ता. २४) अध्यक्ष वीरेंद्र सिंग यांनी जाहीर केल्यानुसार शुक्रवारी (ता.२५) केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने फेडरेशनला पीएसएफ योजनेंतर्गत अतिरिक्त एक लाख टन कांदा खरेदी करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार फेडरेशनतर्फे जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, उमराणे, मुंगसे, मालेगाव, नामपूर, मनमाड, पारनेर, झोडगे, डेरे, सोनगाव, पिंपळखोटे येथील फार्मगेट येथे सोसायट्या शेतकरी उत्पादक कंपन्यामार्फत खरेदी सुरू केली. (Onion purchase started in district by federation nashik)

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर आणि अहमदनगरमध्येही खरेदी सुरू आहे. मध्य प्रदेशातील फार्मगेट येथील संस्थांकडून फेडरेशनकडून कांदा खरेदी सुरू आहे.

सध्या मध्य प्रदेशात बदनावर, इंदूर आणि राजगढमध्ये तीन केंद्रे उघडण्यात आली आहेत. कांद्याची उपलब्धता आणि मागणी लक्षात घेऊन अधिक खरेदी केंद्रे उघडली जाणार आहेत.

फेडरेशनतर्फे हेल्पलाइन क्रमांक

फेडरेशनतर्फे महाराष्ट्रातील हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी ०२५३-४०१३३७० या क्रमांकावर शेतकरी संपर्क साधू शकतात, असे फेडरेशनतर्फे कळविण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rashmi Barve: 'जातवैधता' बाबत रश्मी बर्वेंना 'सर्वोच्च' दिलासा, पडताळणी समितीला दंड! राज्य सरकारवर न्यायालयाचे ताशेरे

Latest Maharashtra News Updates : नागपूर शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस; वर्ध्यासह पश्चिम विदर्भात 'यलो अलर्ट'

शस्त्र परवाना देण्यावर पोलिसांचे निर्बंध! सोलापूर जिल्ह्यातील 4594 जणांकडे वैयक्तिक शस्त्र परवाने; अकलूजमध्ये सर्वाधिक, कोणत्या तालुक्यात किती जणांकडे बंदुका, वाचा...

गुणवत्तेअभावी घटतोय झेडपी शाळांचा पट! शाळांच्या भेटीसाठी नाहीत केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी; 136 केंद्रप्रमुख, 10 गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त, विषय शिक्षकही कमी

Ajit Pawar : 'त्या' आमदाराचं राष्ट्रवादीनं केलं निलंबन; जाणून घ्या काय आहे प्रकरण..

SCROLL FOR NEXT