निर्यातवरील ४० टक्के शुल्क रद्द करावे, नाफेड, एनसीसीएफमार्फत खरेदी केलेला कांदा थेट बाजारात विक्री करू नये यांसह विविध मागण्यांठी कांदा व्यापाऱ्यांनी संप पुकारला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बंद असून, सणासुदीच्या काळात कांदा विक्री कशी करावी, असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर ठाकला आहे. (Onion Traders Strike Market Committee closed Big Hit To Onion Producers Major loss of onion in chawl nashik)
गेल्या एप्रिल आणि मेमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शेतातील कांदा काढला. मात्र, त्यावेळी सरासरी बाजार भाव ४०० ते ७०० रुपयांदरम्यान मिळत होता.
त्यातून उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले. चांगला बाजार भाव मिळेल, या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चाळींमध्ये काढलेला उन्हाळी कांदा साठवून ठेवला.
सततच्या ढगाळ हवामानामुळे चाळीमध्ये साठवलेला उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला व वजनात घट आल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली.
परतीच्या पावसाने ठिकठिकाणी चांगली बॅटिंग केल्यामुळे वातावरणात गारवा तयार झाल्याने कांद्याला कोंब येत असून, कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
अशातच बाजार समित्या बंद असल्यामुळे सणासुदीच्या काळात कांदा विक्री करावा कसा, असा प्रश्न आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
"खरीप लाल कांद्याच्या लागवडीसाठी पैशांची आवश्यकता पडेल, या हिशोबाने दीडशे क्विंटल कांदा चाळीत साठवून ठेवला. कांदा लागवडीसाठी पैशांची आवश्यकता असताना, कांदा व्यापाऱ्यांनी संप पुकारल्याने कांद्याची विक्री कशी करावी, असा प्रश्न उभा राहिला आहे. दुसरीकडे ढगाळ हवामानामुळे मोठ्या प्रमाणात कांदा सडतोय. पुढील पीक घ्यावे कसे? कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? नवरात्रोत्सव आणि दिवाळी कशी करावी, असे प्रश्न उभे राहिले आहेत."- किशोर कुटे, कांदा उत्पादक शेतकरी, वेळापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.