The seeds purchased from the seeds company are of poor quality and have come directly from the dongles esakal
नाशिक

Nashik News : कांद्याला थेट डोंगळेच आले! नगरसूलचे शेतकरी भरपाईसाठी शेतकरी न्यायालयात

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील कांदा उत्पादक शेतकरी भाऊलाल कुडके यांनी शेतात लागवडीसाठी वापरलेले कांदा बियाणे निकृष्ठ दर्जाचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांनी बियाणे कंपनीकडून नुकसान भरपाई मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. (Onions crop damaged duw to seeds Farmers of Nagarsul in Farmers Court for compensation Nashik News)

येथील भाऊलाल कुडके यांनी उन्हाळ कांदा लागवडीसाठी चितेगाव येथील कांदा अनुसंधान केंद्राचे NHRDF कंपनीचे रेड-३ बियाणे येवला येथील कंपनीचे अधिकृत विक्रेते नंदा सीड्स येवला यांच्याकडून खरेदी केले होते.

कांदा रोप तयार करून २८ नोव्हेंबर २०२२ ला येथील गट क्रमांक १७०८ मध्ये ३० गुंठे क्षेत्रात लागवड केली. पिकांचे संगोपन खत, पाणी व्यवस्थापन योग्य होते. पण जेव्हा कांदा गाठबांधायला लागला तेव्हा संपूर्ण कांदा लागवड केलेल्या क्षेत्रात डोंगळे दिसायला लागले.

कांदा उपटून पाहिला असता तो दुभाळा दिसला. काही कांद्याना तर दोन तिन फनगडे दिसले. त्यावर लागलीच शेतकरी कुडके यांनी बियाणे खरेदी केलेल्या येवला येथील नंदा सीड्स दुकानात तक्रार केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यानंतर येवला पंचायत समितीच्या कृषी अधिकारींकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर दिलेल्या तारखेला उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, कृषी संशोधन केंद्राचे डॉ. आर. बी. सोनवणे (कांदा अनुसंधान केंद्र पिंपळगाव बसवंत) व येवला पंचायत समितीचे यू. बी. सूर्यवंशी यांनी पाहणी केली असता या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कांदा दभाळका व डेंगळे असल्याचे आढळून आले आहे.

त्यावर समितीने पीक पंचनामा करून प्रतही शेतकरी कुडके यांनी दिली. त्याआधारे भाऊलाल कुडके ग्राहक न्यायालयात नुकसान भरपाईसाठी धाव घेतली आहे.

"खरेदी केलेले बियाणे निकृष्ठ दर्जाचे असल्याचे कृषी अधिकारी व कृषिअभ्यासक व कंपनी प्रतिनिधिनी मान्य केले आहे. ८० ते ९० टक्के डेंगळे आल्याने कांद्याचे नुकसान झाले आहे."

- भाऊलाल कुडके, शेतकरी, नगरसूल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

सुखविंदर सिंग आणि पुण्याचं आहे खास कनेक्शन, म्हणतात- इथे आलो की कधीच गाडीने फिरत नाही कारण...

Latur Assembly Election 2024 : देशमुख विरुद्ध चाकूरकरांमध्ये सरळ लढत, लातूर शहर मतदारसंघात २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT