Rojgar-Hami-Yojana esakal
नाशिक

Rojgar Hami Yojana : रोजगार हमीच्या कामांना ऑनलाइन हजेरी सक्तीची

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांवरील मजुरांची उपस्थिती नोंदविण्यासाठी १ जानेवारीपासून मोबाईलद्वारे एनएमएमएस (NMMS) या प्रणालीचा

वापर करून दिवसातून दोन वेळा (सकाळी ६ ते ११ व दुपारी २ ते ४ ) फोटो अपलोड करणे बंधनकारक केले आहे. (Online attendance for employment guarantee works is mandatory nashik news)

या निर्णयामुळे जिल्ह्यातील कुशल व अकुशल मजुरांकडून करण्यात येणारी रोजगार हमी योजनेतील सार्वजनिक कामे गत दोन महिन्यांपासून ठप्प आहेत.

या योजनेतून सार्वजनिक व वैयक्तिक लाभाची कामे करता येतात. रोजगार हमी योजनेतील काम करण्यासाठी मजुरांनी रोजगार कार्ड नोंदविणे गरजेचे असते. त्यानंतर ही कामे करता येतात. वैयक्तिक लाभाच्या योजनेत प्रत्यक्ष लाभधारक कुटुंबातील सदस्यांकडे रोजगार कार्ड असणे बंधनकारक असते.

सार्वजनिक कामे जसे पांधण रस्ता, शिवार रस्ता, बंधारे आदी कामे करताना ९० टक्के काम यंत्राने व दहा टक्के काम मजुरांकडून करून घेणे बंधनकारक असते. यापूर्वी कुशल व अकुशल कामांचे ६०:४० हे प्रमाण गावपातळीवर राखणे बंधनकारक असल्यामुळे सार्वजनिक कामे करण्यास मर्यादा येत होत्या.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

आता हे प्रमाण जिल्ह्यासाठी ठरविण्यात आल्यामुळे रोजगार हमीतील कामांचा आराखडा तयार करताना वन विभाग, सामाजिक वनीकरण, जलसंधारण विभाग, तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांवरील मजूर यांच्या संख्येवरून ६०:४० प्रमाण राखले जाते. यामुळे रोजगार हमी योजनेतून रस्ते, शिवार रस्ते, पांदण रस्ते, तसेच बंधाऱ्यांची कामे मोठ्या प्रमाणावर मंजूर केली जातात व त्यात ठेकेदारी पद्धतीने शिरकाव केला.

या सार्वजनिक लाभाच्या कामांमध्ये मजुरांकडून ४० टक्के काम करून घेणे अपेक्षित असताना ठेकेदार संपूर्ण काम मजुरांकडून करून घेतात व ग्रामरोजगार सेवकास हाताला धरून केवळ कागदोपत्री मजुरांची हजेरी दाखवली जाते, अशा तक्रारी सरकारकडे गेल्या.

त्यामुळे आता सार्वजनिक लाभाच्या कामांवरील मजुरांची मोबाईल ॲपद्वारे हजेरी घेणे बंधनकारक केले आहे. पूर्वी हा नियम २० पेक्षा अधिक मजूर असलेल्या कामांसाठीच लागू होता. आता तो सरसकट लागू केला आहे. कामावर आल्यावर मजुरांचे दोन सत्रातील फोटो अपलोड झाले, तरच मजुरी मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT