Students attendance esakal
नाशिक

Online Attendance: 1 डिसेंबरपासून विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन! राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी : राज्यातील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची १ डिसेंबरपासून उपस्थिती रोज ऑनलाईन स्वरूपात नोंदविण्यात येणार आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी आदेश दिले आहेत. शिक्षकांना यापुढे मोबाईलवर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविणे अनिवार्य आहे. (Online attendance of students from December 1 Orders of State Council of Primary Education nashik)

शिक्षण क्षेत्रातील उपक्रम ,योजना आखण्यास मदत व्हावी, यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद अंतर्गत पुण्यात विद्या समीक्षा केंद्र कार्यान्वित झाले आहे. केंद्रामार्फत चॅटबॉटच्या वापरासंबंधी विभाग, तालुका व केंद्रस्तरापर्यंत सर्व शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे.

उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत पर्यवेक्षकीय यंत्रणा नियमितपणे आढावा घेणार आहे. प्रशिक्षणात दिलेल्या सुचनेनुसार चॅटबॉटद्वारे इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवावी.

उपस्थिती नोंदविताना शिक्षकांनी आपल्या शाळेचा यु-डायस कोड व स्वतःच्या शालार्थ आयडीचा वापर करावा. शिक्षकांनी शालार्थ पोर्टलवर नोंदविलेला मोबाईल क्रमांकच वापरावा. आपला मोबाईल क्रमांक बदलल्यास शालार्थ पोर्टलवर तो अपडेट करावा.

सद्यस्थितीत जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, अनुदानित शाळेतील शालार्थ आयडी उपलब्ध असलेल्या शिक्षकांना चॅटबॉटवर विद्यार्थी उपस्थिती नोंदविता येईल. सेवार्थ व इतर प्रणालीमध्ये वेतन असणाऱ्या शिक्षकांना चॅटबॉटवर विद्यार्थी उपस्थिती नोंदविण्याबाबत स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल.

चॅटबॉटवर दोन सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी सात ते दुपारी १२, तर अन्य शाळांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद करावी. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), समग्र शिक्षा विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतील.

विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती चॅटबॉटवर नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत जिल्हा नोडल अधिकारी आपल्या स्तरावरून आढावा घेतील. ऑनलाईन उपस्थिती नोंदविताना येणाऱ्या अडचणी लिंकवर नोंदविता येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील १३१०९ मतांची आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT