Cyber Crime esakal
नाशिक

Nashik Cyber Crime: ऑनलाईन पार्ट टाईम जॉबमुळे उच्चशिक्षिताला गंडा; सायबर भामट्याने केली पावणेतीन लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Cyber Crime : टेलिग्राम या सोशल मीडियावर ऑनलाईन पार्टटाईम जॉब करण्यासाठीचे आमिष दाखवून सायबर भामट्याने उच्चशिक्षित तरुणाला तब्बल पावणे तीन लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Online part time job scams highly educated fraud of 3 lakhs done by cyber scammer Nashik Cyber ​​Crime)

वाणिज्य शाखेत एमकॉम असलेल्या अभिषेक रामप्रसाद अग्रहरी (रा. पेठरोड, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना गेल्या सप्टेंबर महिन्यात सायबर भामट्याने फोन केला आणि टेलीग्राम या सोशल मीडिया साईटवर पार्ट टाईम जॉबच्या माध्यमातून चांगली आर्थिक कमाई करण्याचे आमिष दाखविले.

त्यासाठी सायबर भामट्याने एक लिंक पाठवून एअर तिकीट बुकींग करण्याचे टास्क दिले होते. टास्क पूर्ण करूनही त्यांना परतावा मिळाला नाही. त्यांनी कामाच्या परताव्याची मागणी केली असता संशयितांनी त्यांना काही प्रक्रियेच्या नावाखाली पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँक, एस बँक या खाते क्रमांकावर काही ना काही कारणांनी पैस भरण्यास सांगितले. त्यानुसार, अभिषेक याने २ लाख ७६ हजार ८९७ रुपये भरले.

त्यानंतरही संशयितांकडून पैशांची मागणी सुरू राहिल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली.

त्यानुसार, टेलीग्रामवरील तीन अकाऊंट व तीन बँकेच्या खातेदारांविरोधात सायबर कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रिजाय शेख तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Assembly News: बारामतीत खळबळ! श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये रात्री सर्च ऑपरेशन, काय म्हणाले युगेंद्र पवार ?

थोडक्यात वाचला! फलंदाजाचा स्ट्रेट ड्राईव्ह अन् अम्पायरचा चेहरा...; भारतीय संघ सराव करतोय त्या 'पर्थ' येथे घडला प्रकार

Latest Marathi News Updates : पुण्यात अजूनही उमेदवारांकडून प्रचार सुरू

Ramesh Kadam: शरद पवार गटाच्या नेत्याच्या अपहरणाचा प्रयत्न, म्हणाले-बाबा सिद्दिकींप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव

'पाथेर पांचाली' मधील दुर्गा कालवश ; ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांच्या निधनाने बंगाली सिनेविश्वाला धक्का

SCROLL FOR NEXT