Nashik Police logo with X, WhatsApp logo esakal
नाशिक

Online Policing: सोशल मीडियावरूनही ‘ऑनलाइन पोलिसिंग’! एक्स हॅन्डलवरील तक्रारींची तत्काळ दखल

लवकरच व्हॉट्सॲपचाही प्लॅटफॉर्म होणार उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील गुन्हेगारी, अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी नाशिक शहर पोलिसांकडून धडक कारवाई सुरू आहे. तसेच, या सुरू असलेल्या कारवाईची माहितीही पोलिसांकडून सोशल मीडियाच्या ‘एक्स’ हॅन्डलच्या माध्यमातून प्रसारित केली जात असल्याने त्यावर सुजाण नाशिककरांकडून तक्रारीही केल्या जात आहेत.

या तक्रारींची तत्काळ दखल घेत पोलिसांकडून कारवाईही होते आहे. परंतु एक्स हॅन्डलची मर्यादा लक्षात घेता लवकर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून प्रत्येक नाशिककरांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न नाशिक पोलिस करणार आहेत. या ऑनलाइन पोलिसिंगमुळे टवाळखोरांसह भाईगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (Online policing even from social media Prompt attention to complaints on X Handle soon on whatsapp nashik police)

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पदभार घेतल्यापासून सोशल मीडियावरील माध्यमांचा खुबीने वापर करीत नाशिककरांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जातो आहे.

सुमारे २० लाख लोकसंख्येच्या शहरात जवळपास प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन आलेला आहे. तर, शहरातील प्रत्येक घटनेची खबर याच सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरून व्हायरल होत असते.

नाशिक शहर पोलिसांचे ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) हॅन्डल असून, या हॅन्डलला ४८ हजार फॉलोवर्स आहेत. आयुक्त कर्णिक यांनी याच हॅन्डलवरून शहर पोलिसांकडून सुरू असलेल्या धडक कारवाईची माहिती व्हायरल करणे सुरू केल्याने ‘ऑनलाइन पोलिसिंग’ पाहून टेक्नोसेव्ही नाशिककरांनीही स्वागत करीत कौतुक केले.

तसेच या हॅन्डलवरून ते आपापल्या परिसरातील तक्रारीही करीत आहेत. या तक्रारींची पोलिसांकडून तत्काळ दखल घेऊन कारवाईही केल्यानंतर ‘रिप्लाय’ही दिला जात असल्याने टेक्नोसेव्ही नाशिककर समाधानही व्यक्त करीत आहेत.

मात्र, एक्स हॅन्डलबाबत पोलिसांना मर्यादाही पडत आहेत. पोलिसांच्या हॅन्डला ४८ हजार फॉलोअर्स असले तरी त्याहीपेक्षा अधिक ऑनलाइन नाशिककरांपर्यंत पोलिसांना पोहोचायचे आहे.

त्यासाठी व्हॉट्सॲपचा प्लॅटफॉर्मवर लवकरच नाशिक पोलिस नाशिककरांच्या संपर्कात येणार आहे. पूर्वीचे आयुक्त अंकुश शिंदे यांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नाशिक पोलिसांना तक्रारी करण्याचे आवाहन केले.

परंतु त्याचा प्रचार-प्रसार झाला नाही. तसेच त्यावर अजूनही तक्रारी येतात. याच प्लॅटफॉर्मचा वापर अधिक करण्यासाठी लवकरच नवीन स्वरूपात विकसित केले जाणार आहे.

"आजकाल नागरिक सोशल मीडियाचा वापर अधिक करतात. त्या माध्यमातून पोलिसिंग करणे काळाची गरज आहे. एक्स हॅन्डलप्रमाणेच व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या समस्या-तक्रारी थेट पोलिसांपर्यंत पोहोचविता येणे शक्य होणार आहे. त्याबाबत कार्यवाही सुरू आहे."- संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT