Electricity Theft esakal
नाशिक

Nashik Electricity Theft: वीजचोरीच्या 284 घटना, आरोपपत्र केवळ 18; मालेगावातील गंभीर स्थिती

महापालिका हद्दीत मालेगाव पॅावर सप्लाय कंपनी (एमपीएसएल) तर्फे सर्व प्रकारच्या ग्राहकांना १ मार्च २०२० पासून वीज वितरणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

गोकूळ खैरनार

Nashik Electricity Theft : महापालिका हद्दीत मालेगाव पॅावर सप्लाय कंपनी (एमपीएसएल) तर्फे सर्व प्रकारच्या ग्राहकांना १ मार्च २०२० पासून वीज वितरणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शहरात होणारी वीजचोरी कंपनीची डोकेदुखी ठरत आहे. मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांच्या तसेच बिल थकविणाऱ्यांची वीजजोडणी खंडित केली जात आहे.

यातून ग्राहक व कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत आहेत. दुसरीकडे २०२० ते २३ या कालावधीत वीज चोरीचे २८४ गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल आहेत. यातील केवळ १८ गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहेत.

दरम्यान थकीत ग्राहकांमध्ये प्लॅस्टिक कारखान्यांचा समावेश अधिक आहे. (only 18 cases of power theft charge sheet out of 284 nashik news)

शहरात वीजमीटरमध्ये फेरफार करण्याचे प्रकार अनेक वर्षापासून केले जात आहेत. रिमोटद्वारे मीटर बंद करण्याची कला देखील येथे काही कारागिरांना अवगत आहे. वीजचोरीमुळे कंपनी व शासनाचे नुकसान होत आहे. यात काही ग्राहक कोणत्याही प्रकारची वीज चोरी न करता प्रामाणिकपणे बिल अदा करीत आहेत.

वीज चोरी व मीटरमध्ये फेरफार तपासासाठी कंपनीतर्फे पथक नेमण्यात आले आहे. कंपनीने २०२० ते २०२३ या कालावधीत एकूण २८४ गुन्हे दाखल तालुका पोलिस ठाण्यात दाखल केले आहेत. गुन्हे दाखल झाले असले तरी पुढील प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. आतापर्यंत केवळ १८ गुन्ह्यातील दोषारोप पत्र (चार्जशीट) दाखल झाले आहेत.

वीजसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेकदा ग्राहकांकडून मारहाण केली जाते. पोलिस यंत्रणा या प्रकरणांकडे दुर्लक्ष करून गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप केला जात आहे. एमपीएसएल पथकाने पोलिसांची मदत घेत थकीत वीज ग्राहकांवर कारवाई केली जात आहे. थकीत ग्राहकांची वीज जोडणी खंडित करण्यात येत आहे.

अशी आहे थकबाकी

एकूण थकबाकी ः १३४ कोटी १३ लाख.

निवासी ग्राहक ः ५१.०३ कोटी

व्यावसायिक, औद्योगिक ः६६.४७ कोटी

कृषी ग्राहक ः ११.४ कोटी

इतर ग्राहक ः ५.२३ कोटी

"महाराष्ट्र इलेक्ट्रीक सिटी रेग्युलेटरी कमिशनरने तयार केलेल्या दरानुसार वीज ग्राहकांकडून बिल आकारण्यात येते. ग्राहकांनी वेळेवर वीजबिल भरावे. मीटरमधून वीज वापरावी. काही लोक अन्य मार्गाने वीजपुरवठा सुरु करतात. मीटरमध्ये छेडछाड केली जाते. मागणीप्रमाणे ग्राहकांना आम्ही नवीन मीटर देण्यास तयार आहोत. मीटरमध्ये फेरफार व वीजचोरी करणाऱ्यांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जाईल." - प्रेमसिंग, सीईओ, मालेगाव पॅावर सप्लाय कंपनी.

वीजबिलात दुपटीने वाढ

मालेगाव पॅावर सप्लाय कंपनीकडे वीज वितरण दिल्यापासून वीज बिलात दुपटीने वाढ झाल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. कंपनीने अधिक गतिमान मीटर बसवले आहेत. कंपनीचे अधिकारी व कर्मचारी ग्राहकांना थकीत बिलासाठी त्रास देतात असा ग्राहकांचा आरोप आहे. गेल्या तीन वर्षात कंपनीच्या कामकाजाबाबत येथील पूर्व भागातील सर्व राजकीय पक्षांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange News: आम्ही मैदानात उतरलो नाही, तरीही फेल झाले म्हणता... मनोज जरांगेंचा सवाल

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: आयपीएलचा मेगा लिलाव आज! ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुलसह मोठे स्टार आज रिंगणात!

Sunil Shelke Won Maval: तो एक फोटो अन्... भाजप विरोधात तरी सुनील शेळके कसे निवडून आले? अजित पवारांनी सांगितला किस्सा

Nashik Assembly Election 2024 Result : साडेपाच हजार मतदारांनी वापरला ‘नोटा’; 3 मतदारसंघांत 106 जणांची पोस्टलमधून नकारघंटा

Maharashtra Assembly Election 2024 Results : सांगली जिल्ह्यात ‘मायक्रो प्लॅनिंग’ने भाजपची ‘मविआ’ला धोबीपछाड

SCROLL FOR NEXT