Only 33 percent of rainfall in yeola nashik news esakal
नाशिक

Nashik Rain Crisis : 30 हजार हेक्टरवरील पिकांची राखरांगोळी; येवल्यात फक्त 33 टक्के पाऊस

संतोष विंचू

Nashik Rain Crisis : अवघा ४० टक्के पाऊस, शेतात करपत असलेली पिके, ४० च्यावर गावात सुरू असलेले पाणी टँकर अन् पिकांनी माना टाकल्याने भकास दिसणारे माळरानापेक्षा वेगळे चित्र दुष्काळाचे असते का? खरंतर येवलेकर दुष्काळ अंगाखांद्यावर खेळवत दर वर्षी त्याला पोसतात.

यंदा पुन्हा तीच परिस्थिती ओढावल्याने शेतकऱ्यांपुढे मोठी चिंता उभी राहिली आहे. आजच्या घडीला तालुक्यातील ३० ते ३५ हेक्टरवरील पिके अडचणीत सापडून डोळ्यादेखत राखरांगोळी होत असल्याने दुष्काळ शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.

अत्यल्प पाऊस, अवर्षणप्रवण भाग आणि टॅंकरग्रस्त गावे हा तालुक्याचा ब्रिटिशकालीन इतिहास आहे. दोन वर्षे वरुणराजाने चांगली साथ दिल्याने तालुक्यात रब्बी व खरीप हंगाम फुलला. (Only 33 percent of rainfall in yeola nashik news)

अर्थात, गेल्या वर्षी ओल्या दुष्काळाने पिके सडली होती. या वर्षी कोरडा दुष्काळ दारात येऊन उभा असल्याने आता शासनाने दुष्काळ जाहीर करण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

तालुक्याच्या अवर्षणप्रवण पूर्व भागाला दर वर्षी अख्ख्या तालुक्याला दोन वर्षांआड सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊन दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागतो. यंदा पावसाळ्याचे तीन महिने संपल्यावर फक्त १८० मिलिमीटर पाऊस झाला असून, हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या केवळ ३३ टक्के आहे.

यामुळे भाजलेले रान अन् करपलेले शेत पाहताना मन हळवे होते. पावसाळ्यात तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. २० टँकरने ३२ गावे व १५ वाड्यांना पाणी पुरविले जात असल्याने टंचाईची दाहकता लक्षात येते.

पूर्ण ऑगस्ट संपत आला, पण पावसाचा पत्ता नसल्याने अनेक पिकांचे जगणं केवळ आठवडाभरापुरतेच उरल्याची स्थिती आहे. कधीतरी पावसाचे थेंब येतात. त्याने जमीनही ओली होत नाही. तेव्हा पिकांना फायदाच नसल्याची स्थिती दिसते.

यंदा जूनला गायब झालेला पाऊस जुलैत अनेक गावांत पेरणीयोग्य झाला. अल्प पाऊस असूनही शेतकऱ्यांनी महागडी बियाणे घेऊन कापूस, मका, सोयाबीन, मुगाची पेरणी केली. मात्र, जुलैच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली. तो पुन्हा दिसलाच नाही. परिणामी पावसाअभावी प्रत्येक गावांत उभी पिके करपू लागली आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दोन महिन्यांपासून रोजच आकाशात ढग दाटून येतात अन् पावसाचे वातावरणही तयार होते. मात्र, रोजच पाऊस हुलकावणी देत आहे. गेल्या आठवड्यात रखरखीत ऊन पडल्याने पिकांची अवस्था केविलवाणी झाली आहे. पावसाने डोळे वटारल्याने पिके आता नावापुरतीच शेतात उभी आहेत.

उभ्या पिकांचा पालापाचोळा!

तालुक्यात सुमारे ७५ हजार हेक्टरवर पेरणी झाली. पाणी असलेले शेतकरी तुषार, ठिबक सिंचनाने पाणी देत आहेत. मात्र, ९० टक्के शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध नसल्याने डोळ्यासमोर पिके करपताना पाहण्याची वेळ आली आहे. निम्म्याहून अधिक क्षेत्रात मका करपला असून, इतर जमिनीतही पाने सुकलेली दिसतात.

मुगाचा पूर्ण पालापाचोळा झाला आहे. जमिनीलाच खिळून असलेली कपाशीही सुकू लागली आहे. सोयाबीन पिवळे पडून आता करपण्याच्या दिशेने चालले आहे. सर्वच पिकांचा फुलोरा आणि कळीचा कालावधी निघून गेल्याने आता पाऊस पडला तरी हाती काही लागण्याची शक्यता कमीच आहे.

त्यामुळे पेरण्या झालेल्या क्षेत्राची तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत. नुकसानग्रस्तांना शासनाकडून रोख रक्कम मिळावी, चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

अशी झाली पेरणी...

पीक--लक्षांक--पेरणी--टक्के

बाजरी- ९७३०- ५३५६- ५५

मका- ३५११९- ४१३६८-११८

तूर- ११२८-१५८-१४

मूग- ५२४०-९३१४-१७८

भुईमूग- २६१४-१३६५-५२

सोयाबीन- ४७१२-१६३३७-३४६

कापूस- ११०३९-१२८३-१२

एकूण- ७०५९७-७५१८५-१०६

"राजापूर, ममदापूर परिसरात पाऊस नसल्याने मूग, मका, सोयाबीन करपत आहे. इतर सर्वच पिकांची अवस्था गंभीर असून, पंचनामे करून दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. आम्ही मका करपू लागल्याने जनावरांना चारा म्हणून मिळेल, त्या मोबदल्यात देऊन टाकला आहे." -ज्ञानेश्वर घुगे, शेतकरी, राजापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Sawant: 'इम्पोर्टेड माल' प्रकरण अरविंद सावंत यांना भोवलं! शयना एनसींच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Virat Kohli RCB Captain: विराट कोहली पुन्हा कर्णधारपदी दिसणार का? मुख्य प्रशिक्षक Andy Flower यांनी दिले मोठे संकेत

India Global Mediator: जागतिक मध्यस्थ म्हणून भारताचं स्थान बळकट; BRICS आणि G7 परिषदांमध्ये भारताची भूमिका ठरली महत्वाची

दिवाळीला पत्नी माहेरून आली नाही, नैराश्यातून पतीनं चिमुकल्याला संपवलं, नंतर... घटनेनं खळबळ

Latest Marathi News Updates: अरविंद सावंत यांच्या विरोधात FIR दाखल

SCROLL FOR NEXT