Nashik News : अलनिनोच्या सावटाची चिंता जिल्हा प्रशासनाला लागली असल्याने आत्तापासूनच पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे.
त्यातच वाढलेली उष्णता व बाष्पीभवनामुळे जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा वेगाने खालावत असून, आजअखेर केवळ ३६ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे. (Only 36 percent water storage in dams in district nashik news)
त्यामुळे पाऊस लांबू नये अशीच प्रार्थना करण्याची वेळ जिल्हावासियांवर आली आहे. यंदा पावसाने कुणालाच नाराज न करता जिल्ह्यात सर्वत्र धो-धो पाऊस पडला. किंबहुना खरीपातील पिके शेतातच सडवून कोट्यवधींचे नुकसान या पावसाने केले. असे असले तरी अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील जिल्हा असल्याने दिवाळीनंतरच सिंचनासाठी व पिण्यासाठी धरणातून पाण्याची आवर्तने देण्याची वेळ येते.
परिणामी धरणे फुल असली, तरी हळूहळू पाणीसाठा खालवत जातो. जिल्ह्यात यावर्षी १ हजार २३ मिलिमीटर म्हणजेच १२९ टक्के पाऊस पडला. दुष्काळी तालुक्यात सरासरी १५० टक्क्यांवर कृपा केली, तर मिनी कोकण मानल्या जाणाऱ्या सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी या तालुक्यांतदेखील यंदा चांगला पाऊस झाला होता.
विशेष म्हणजे धरणांच्या दिंडोरी तालुक्यात २३० टक्के, सुरगाण्यात १३० टक्के, दुष्काळी चांदवडमध्ये १९५ टक्के, त्र्यंबकेश्वरमध्ये १०४ टक्के, तर इगतपुरीत ७८ टक्के पाउस पडला. एकूणच जिह्यात विक्रमी पाऊस होऊनही यावर्षी लवकरच पाणीसाठा खालावत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची मागणीही वाढली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यामुळे पाण्याच्या उपलब्धतेत वेगाने घसरण होताना दिसते आहे. यामुळेच पाटबंधारे विभागाने मार्चमध्येच पालिकांना पत्र देऊन अलनिनोच्या आगमनाने पावसाळा लांबण्याची शक्यता गृहीत धरून पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. किंबहुना १० जूननंतरच पालखेडचे आवर्तन मिळेल, असेही सूचित केले आहे. पालकमंत्री दादा भुसे, तसेच माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही आढावा बैठकांमध्ये ऑगस्टपर्यंत पाणी वापरण्याच्या सूचना केल्या आहेत.
बाष्पीभवनामुळे घट
विशेष म्हणजे २४ एप्रिलपर्यंत धरणात ४१ टक्के पाणीसाठा होता. अवघ्या २० दिवसांतच जिल्ह्यातील धरणातील सरासरी पाणीसाठ्यात ६ टक्के घट झाली आहे. गंगापूर धरणात मार्चअखेर ५३ टक्के असलेला पाणीसाठा आता ४७ टक्क्यांपर्यंत घटला आहे. पालखेड, करंजवन, वाघाड धरण क्षेत्रात केवळ २२ टक्केच पाणीसाठा आहे.
घटलेल्या पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यात शेती सिंचनाचा तर प्रश्नच उरला नाही; परंतु पाऊस पडून धरणात मुबलक पाणीसाठा होईपर्यंत म्हणजे जून-जुलैपर्यत हे पाणी जपण्याची वेळ आली आहे. दिवसागणिक टँकरची मागणीही वाढत आहे.
त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याचीही अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्ह्यात मध्यम १७ व मोठे ७ असे २४ पाणी साठवण प्रकल्प आहेत. यांची एकूण पाणी साठवण क्षमता ६५ हजार ६६४ दशलक्ष घनफूट असून, मागील वर्षीप्रमाणेच आजमितीला २३ हजार ३९८ दशलक्ष घनफूट म्हणजे ३६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
प्रमुख धरणांतील पाणीसाठा (दशलक्ष घनफुटमध्ये)
धरण पाणीसाठा टक्केवारी
गंगापूर २६६८ ४७
पालखेड समुह १८०० २२
करंजवन १४७९ २९
ओझरखेड ५९१ २८
दारणा ४२८५ ६०
भावली ३०० २१
मुकणे ३८५८ ५३
वालदेवी २९४ २६
कडवा ४४४ २६
भोजापूर ७२ २०
चणकापूर ९९१ ४१
गिरणा ५१२१ २८
हरणबारी ५९८ ५१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.