Jal Jeevan Mission News esakal
नाशिक

Jal Jeevan Scheme : जिल्ह्यात 15 दिवसात केवळ 59 जलजीवनच्या योजना सुरू

सकाळ वृत्तसेवा

Jal Jeevan Sheme : गत तीन महिन्यांपासून जलजीवन मिशन अंतर्गत कामे सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेत प्रशासनाची धावपळ सुरू असताना २७ मार्च अखेर जिल्ह्यातील १२५ कामे सुरू झालेली नव्हती.

गत १५ दिवसात यातील केवळ ५९ जलजीवन योजनांच्या कामांना सुरवात झाली आहे. अद्यापही ६६ योजनांना प्रारंभ झालेला नाही. प्रामुख्याने पाण्याचे स्रोत उपलब्ध न होणे, वन, जलसंपदा विभागाच्या परवानगी न मिळणे, गावांतर्गत वाद यामुळे या योजना सुरू झालेल्या नाहीत. (Only 59 Jal jeevan schemes started in district in 15 days nashik news)

जिल्ह्यातील १२९६ गावांसाठी १२२२ जलजीवन योजना मंजूर झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या १२२२ योजनांना कार्यारंभ आदेश दिले आहे. यात ६८१ योजना रेट्रोफिटींग तर, ५४१ योजना नवीन आहेत.

यासाठी २१७.६२ कोटींचा निधी मंजूर आहे. कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्यानंतर योजनेचे काम सुरू होणे अपेक्षित असताना वेळात सुरू होऊ शकलेल्या नाहीत. मार्च अखेर झालेल्या आढावा बैठकीत १२५ कामांना प्रत्यक्ष सुरवात झालेली नसल्याचे समोर आले होते.

अनेक गावांच्या पाण्याच्या गरजेप्रमाणे योजनेचा आराखडा नसल्यामुळे ग्रामपंचायतींनी तक्रारी आल्या होत्या. यानंतर, प्रशासनाने योजना सुरू करण्यासाठी पुन्हा ठेकेदारांकडे तगादा लावला. या तगाद्यानंतर केवळ ५९ योजनांचे काम सुरू झाले आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

अद्यापही ६६ योजनांचे कामांना प्रारंभ झालेला नाही. यात प्रामुख्याने चांदवड तालुक्यातील १० योजनांचा समावेश आहे. या योजनांसाठी निश्चित करण्यात आलेले पाण्याचे स्रोत योग्य नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.

कळवण तालुक्यातील योजनांबाबत गाव अंतर्गत वाद असल्याने योजना सुरू होऊ शकलेल्या नाहीत. पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यात वन खात्याची परवानगी रखडलेली असल्याने योजना रखडल्या आहेत.

मंजूर झालेल्या १२२२ योजनांपैकी १ हजार ९९ कामे प्रगतीत आहे. तर, ५७ योजना फक्त पूर्ण झालेल्या आहेत. या योजना पूर्ण करण्याची मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत आहे. यामुळे तोपर्यंत योजना पूर्ण करण्याचे मोठे आव्हान जिल्हा परिषद प्रशासन व ठेकेदार यांच्यासमोर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT