Funds  esakal
नाशिक

Sakal Exclusive : महसुली गावांच्या विकासासाठी अवघे 87 कोटी; NMRDA बँक खात्याची स्थिती

विक्रांत मते

Sakal Exclusive : विकासाची गती लक्षात घेता नाशिक महापालिकेच्या हद्दीपासून तीस किलोमीटरपर्यंतच्या ग्रामिण भागाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे सहा वर्षात अवघे ८७ कोटी रुपये जमा झाले आहे.

बँक खात्यात जमा निधीतून कुठल्या पायाभूत सुविधा पुरवायच्या, असा प्रश्न प्राधिकरणासमोर आहे. प्राधिकरण असल्याने ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद तसेच आमदारांचे दुर्लक्ष आहे.

शासनदेखील प्राधिकरणाला निधी देत नाही. निधीअभावी असून नसल्यासारखी स्थिती असलेल्या प्राधिकरणाला शासनाकडून निधीची बूस्टर डोस हवा आहे. (only 87 crore for development of revenue villages nashik news )

नाशिक महापालिका हद्दीचे क्षेत्र जवळपास २५९ किलोमीटर आहे. हद्दीत महापालिकेकडे रस्ते, पाणी, मलनिस्सारण, दिवाबत्ती, आरोग्य व प्राथमिक शिक्षण पुरविण्याची जबाबदारी आहे. शहराचा विस्तार वाढत असल्याने शासनाने २०१७ मध्ये मुंबई, पुणे व नागपूरच्या धर्तीवर नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एनएमआरडीए) स्थापना केली.

परंतु स्थापना करताना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी निधीची आवश्‍यकता असते, तसा निधी दिला नाही. त्यामुळे बांधकाम परवानगी देताना विकास शुल्कातून प्राप्त निधीवरच प्राधिकरणाचा डोलारा उभा आहे. महापालिका हद्दीला लागून असलेल्या परंतु एनएमआरडीएच्या हद्दीतील महसुली गावांची स्थिती भयानक आहे.

शहराच्या हद्दीला लागून असल्याने नागरिकरण वाढतं आहे. येथे रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण आदी पायाभूत सुविधा पुरविताना नाकीनऊ येत आहे. महापालिकेला हद्दीबाहेर खर्च करता येत नाही. नागरीकरण वाढतं असल्याने ग्रामपंचायती पायाभूत सुविधा पुरविण्यास असमर्थ आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्राधिकरणाकडे अवघे ८७ कोटी रुपये निधी असल्याने ८१ महसुली गावांच्या समस्या सोडविण्यासाठी निधी अपुरा पडेल. अपुऱ्या निधीमुळे कामाचा प्राधान्यक्रम ठरविता येत नाही. महापालिका हद्दीला लागून असलेल्या गावांमध्ये बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. त्यामुळे प्रथम रस्ते, पाणी या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा पुरविणे आवश्‍यक आहे.

‘एनएमआरडीए’ क्षेत्रातील महत्त्वाची गावे

आंबेबहुला, बाभळेश्वर, बेलतगव्हाण, भगूर (ग्रामीण), चांदगिरी, दरी, दोनवाडे, गणेशगाव, गौळाणे, गिरणारे, चांदशी, गोवर्धन, हिंगणवेढे, जाखोरी, जलालपूर, जातेगाव, कोटमगाव, लाखलगाव, लहवित, लोहशिंगवे, माडसांगवी, महिरावणी, मातोरी, मोहगाव, शिलापूर, शेवगेदारणा, सावरगाव, सारूळ, संसरी, रायगडनगर, राहुरी, पिंपरी- सय्यद, पळसे, ओझरखेड, ओढा, मुंगसेर, शिंदे, तळेगाव-अंजनेरी, वंजारवाडी, वडगाव, शिंगवे-बहुला, सामनगाव, एकलहरे.

"एनएमआरडीच्या हद्दीतील बांधकाम परवानगीतून प्राप्त होणाऱ्या विकास शुल्का व्यतिरिक्त अन्य उत्पन्नाचे साधन नाही. सध्या ८७ कोटी रुपये जमा आहे. एक किलोमीटरचा रस्ता करायचा असल्यास एक ते दोन कोटींचा खर्च येतो. उपलब्ध निधीमधून सर्वच कामे शक्य नाही." - सतीश खडके, आयुक्त, एनएमआरडीए.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT