Zoroastrian Fire Temple esakal
नाशिक

‘द झोरोस्ट्रीयन फायर टेंपल’मध्ये 103 वर्षांपासून अग्नी प्रज्वलित

महेंद्र महाजन

नाशिक : देवळाली कॅम्पच्या ‘द झोरोस्ट्रीयन फायर टेंपल’ (Zoroastrian Fire Temple) मध्ये १०३ वर्षांपासून अग्नी अखंड प्रज्वलित आहे. उत्तर महाराष्ट्रातील पारशी बांधवांचे एकमेव हे मंदिर (Parsees Temple) असून सिकंदराबादच्या रतनबाई चिनॉय यांनी हे मंदिर बांधले आहे. देवळाली कॅन्टोन्मेंटमध्ये (Deolali Cantonment) उद्योजक वासुदेव श्रॉफ यांचे जन्मस्थान असून अभिनेत्री भूमिका चावली (Bhumika Chawala) येथील आहे. (only Parsee temple in north maharashtra Zoroastrian Fire Temple in deolali Nashik News)

नाशिकमध्ये पारसी बांधवांची संख्या दोनशेच्या आसपास आहे. पारशी बांधवांनी अग्नीला राजाचा दर्जा दिला आहे. मंदिरात दिवसातून पाचवेळा पूजा केली जाते. मंदिरात इतरांना मनाई आहे. देशात आठ अग्यारी (मंदिरे) असून त्यातील चार मुंबईत, नवसारीमध्ये एक आणि सुरतमध्ये दोन व नाशिकमध्ये एक आहे. हेडप्रिस्ट हे धर्मगुरू असतात. ते मुंबईत राहतात. त्यांच्या मार्गदर्शनानुसार कामकाज चालते. देवळालीतील अग्नी मंदिरात तीन प्रकारच्या अग्नी एकत्रित केलेल्या आहेत. धूर अधिक होऊ नये म्हणून अग्नीसाठी बाभूळ वृक्षाचे लाकूड वापरले जाते.

"पारसी समाजाची लोकसंख्या कमी असल्याने पुजारी होण्यासाठी लवकर कुणी तयार होत नाही. मी वाणिज्य शाखेत शिक्षण घेताना पुजारीचे काम करत आहे. माझे वडील पुजारी आहेत. देवळाळीतील मंदिरात देशभरातून समाजबांधव दर्शनासाठी येतात."

- रोहिंटन मेहंती (युवा पुजारी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT