Closed Smart Card of Transport Corporation  esakal
नाशिक

MSRTC Smart Card: ठेका संपल्याने कामकाज Offline; राज्यात सवलत योजनांसाठीचे स्मार्टकार्ड झाले शोपीस!

सकाळ वृत्तसेवा

MSRTC Smart Card : राज्यात पुन्हा एकदा एप्रिलपासून सवलतधारक लाभार्थ्यांसाठी ऑफलाइन कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहे. ऑनलाइनकडून एसटी स्मार्टकार्डाची वाटचाल ऑफलाइनच्या दिशेने सुरू झाली आहे. (Operation Offline due to Contract Expiry Smart card for discount schemes in state become showpiece nashik news)

राज्यात परिवहन महामंडळातर्फे बसप्रवास भाड्यात सवलत असलेल्या दिव्यांग, महिला, खेळाडूंसह विविध घटकांसाठी स्मार्टकार्ड सुरू करण्यात आले. मात्र, त्यासाठी दिलेल्या ठेक्यात जुन्या दरात वाढ होत नसल्याने ठेकेदाराने स्मार्टकार्ड तयार करणे बंद केले आहे. त्यामुळे राज्यात एका झटक्यात सगळे स्मार्टकार्ड बाद ठरले आहेत.

राज्यात महिलांसाठी पन्नास टक्के भाड्यात सवलतीची योजना आता सुरू झाली आहे. मात्र त्याआधीपासून ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्रसैनिक, आमदार, दिव्यांग, दलितमित्र, पत्रकार, दिव्यांग, खेळाडू यांसह विविध पुरस्कारार्थींसाठी सवलतीत बसप्रवासाची सुविधा आहे.

संबंधित लाभार्थ्यांना त्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून स्मार्टकार्ड दिले गेले. साधारण २०१८ पासून कार्यान्वित झालेल्या स्मार्टकार्डाद्वारे लाभार्थ्यांना सवलतीत प्रवास करण्याची सोय आहे.

स्मार्टकार्ड वाहकाकडील मॅट्रिक्स तिकीट मशिनमध्ये कार्ड पंचिंग केल्यानंतर त्यात नोंद होऊन सवलतीत प्रवासाची सोय होते. साधारण चार ते साडेचार वर्षांपासून सुरू असलेली ही प्रणाली राज्यभर ठप्प पडली आहे. एका झटक्यात राज्यातील सगळे स्मार्टकार्ड बाद ठरले आहेत.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

ठेका बंद

राज्यात स्मार्टकार्ड तयार करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने ज्या ठेकेदाराला ठेका दिला होता. त्या संबंधित ठेकदार संस्था आणि परिवहन महामंडळ यांच्यात कार्डापोटीच्या रक्कम वाढीबाबत एकमत होऊ न शकल्याने स्मार्टकार्ड बंद झाले आहे.

चार-पाच वर्षांपासून ठेक्याची रक्कम वाढली नाही म्हणून ठेकेदाराने मुदत संपल्याने कार्डाचे कामकाज करायला तसेच त्यांचे नूतनीकरण करायला विरोध दर्शविला. परिणामी, सवलत योजनेसाठी स्मार्टकार्ड ॲक्टिव्ह नसल्याने महामंडळाने पुन्हा एकदा पारंपरिक पद्धतीने प्रत्येक घटकांसाठी ओळखपत्र तयार करण्याची पद्धत सुरू केली आहे.

सगळ्या यंत्रणा ऑफलाइन यंत्रणेकडून ऑनलाइन कामकाजाकडे जात असताना परिवहन महामंडळाचे कामकाज मात्र ऑनलाइनकडून ऑफलाइनकडे गेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT