Panjarpol  esakal
नाशिक

Nashik News : ‘ऑक्सिजन' हवाय ‘कार्बन' नको; पांजरपोळवरून मनसेची भूमिका

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या पांजरपोळच्या जवळपास ३२७ हेक्टर जागा उद्योगांसाठी संपादित करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध असल्याचे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यातर्फे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता.२५) स्पष्ट केले. (Opposition of Maharashtra Navnirman Sena to acquire nearly 327 hectares of Panjarpol land for industries nashik news)

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीमधून बाहेर पडणारा कार्बनडाय ऑक्साईडचा धूर शोषून घेणारे पांजरपोळचा ऑक्सिजन पार्कची कत्तल करण्यास विरोध आहे.

त्याऐवजी या भागातील खासगी जमिनी संपादित करा, अशी स्पष्ट भूमिका घेताना माजी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) व भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांना विरोध केला. पांजरपोळची ३२७ हेक्टर जागा उद्योगासाठी शासनाकडे जाईल. यावरून सध्या नाशिक मध्ये राजकारण पेटले आहे.

भाजपच्या आमदारांनी पांजरपोळ जागा एमआयडीसीसाठी मिळावी, अशी भूमिका घेतली असली तरी भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी मात्र सदर जागा संपादनाला विरोध दर्शविला आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणात उडी घेतली.

शुक्रवारी (ता. २४) राज ठाकरे यांनी मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर, स्थायी समितीचे माजी सभापती सलीम शेख, प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे यांना मुंबईत बोलावून सदर प्रकरणाची माहिती घेतली.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

त्या वेळी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रकल्पाला विरोध नाही, मात्र अडीच लाख वृक्षतोडीला विरोध केला. तीच भूमिका नाशिकमध्ये स्पष्ट करण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने शनिवारी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करण्यात आली.

खासगी जमीन ताब्यात घ्या

नाशिकच्या उत्तम वातावरणाला आणि पर्यावरणाला हातभार लावणाऱ्या चुंचाळे येथील पांजरपोळकडे जवळपास दीड हजार गोधन असून चराईसाठी या क्षेत्राचा वापर केला जातो. ३२७ हेक्टर जमिनीवर अडीच लाखांहून अधिक वृक्षसंपदा व अडीचशे प्रकारचे प्राणी येथे वास्तव्याला आहे.

नाशिकसाठी ऑक्सिजन देणारी फॅक्टरी म्हणूनही पांजरपोळची जागा ओळखली जाते. नाशिकचे हवामान टिकवून ठेवण्यासाठी ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या वृक्षांची गरज आहे. कार्बन तयार करणारे कारखाने नको, कारखान्यांना विरोध नाही, परंतु या भागातील अनेक वर्षांपासून बिल्डरांच्या ताब्यात असलेल्या जागा संपादित करून त्यावर उद्योग उभारले जावेत अशी भूमिका मांडण्यात आली.

शहराध्यक्ष दिलीप दातीर, प्रदेश उपाध्यक्ष अशोक मुर्तडक, पराग शिंत्रे, सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, महिला आघाडीच्या सुजाता डेरे, मनोज घोडके, बंटी लभडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT