Sakal Exclusive : ‘नगरोत्थान'मधून गिरणा धरणातून नांदगाव शहरासाठी समांतर नळपाणीपुरवठा योजनेला अखेर मुहूर्त लागला. ५३ कोटींच्या योजनेसाठी आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे तांत्रिक, प्रशासकीय मंजुरीनंतर कार्यारंभ आदेश जारी झाला आहे.
योजना १८ महिन्यात पूर्ण होणार आहे. ५६ खेडी नळयोजनेच्या अनियमित व विस्कळीत आणि दहा ते बारा दिवसांच्या आवर्तनाचा कालावधी पाणीपुरवठ्याच्या जाचातून नांदगावकरांची सुटका होणार आहे. (order issued for starting parallel water supply scheme for Nandgaon from Girna Dam nashik news)
गिरणा धरण ते नांदगाव नगरपालिकेच्या जलकुंभापर्यंतच्या मुख्य आणि उपजलवाहिन्यात होणारी गळती व आवर्तनाचा लांबणारा कालावधी यावर शाश्वत पर्याय म्हणून शहरासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना सुरू करण्याचा शब्द श्री. कांदे यांनी दिला होता.
गेल्यावर्षी करंजवण योजना व ७८ खेडी योजनानिमित्ताने मनमाड दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे श्री. कांदे यांनी नांदगाव शहराला गिरणा धरणातून समांतर पाणीपुरवठा योजनेची मागणी मंजूर करून घेतली होती.
योजनेच्या कामांचे कार्यारंभ आदेश नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहेत. ही योजना १८ महिन्यांच्या आता प्रत्यक्षात कार्यान्वित करण्याचे बंधन मुंबईतील आर. अँड बी. इन्फ्रा प्रोजेक्ट या ठेकेदार कंपनीवर घालण्यात आले आहेत.
शहरासाठी आता दरडोई दर माणशी दररोज १३५ लीटर शुद्धीकरणासह निर्जंतुक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्याचे शहरवासीयांचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न साकार होण्याची चिन्हे आता दृष्टिक्षेपात आली आहेत. मनमाड पाठोपाठ श्री. कांदे यांनी नांदगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला.
योजनेची वैशिष्ट्ये
० गिरणा धरणातून शहरवासीयांसाठी दरडोई दर माणशी १३५ लीटर या गृहीतकानुसार पाण्याचे आरक्षण मंजूर
० योजनेसाठी २०४१ पर्यंतची लोकसंख्या गृहीत
० गिरणा धरण ते नांदगाव शहर एकूण साडेअठ्ठावीस किलोमीटर अशी मुख्य जलवाहिनी
० शहरांतर्गत जलवाहिनीची एकूण लांबी ३६ किलोमीटर
० पाण्याचा उपसा करण्यासाठी आठ मीटर घेराची उदभव विहीर
० ५६ खेडी योजनेतील असलेल्या जुन्या जलवाहिन्या बदलण्यात येणार
० २९ किलोमीटर लांबीच्या नव्या अशा ३५० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी
० व्हॉल्व्ह खराब होणे, गळती वाढणे असे गैरप्रकार टाळले जाणार
० ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागील सरकारी जागेवर स्वतंत्र ६० लाख लीटर क्षमतेचे अद्ययावत जलशुद्धीकरण केंद्र
० लक्ष्मीनगर येथे ३ लाख ६५ हजार लीटर व गुरुकृपा कॉलनी येथे ४ लाख लीटर क्षमतेचे दोन नवे जलकुंभ
"नांदगाव शहराची पिण्याच्या पाण्याची भेडसावणारी समस्या दूर करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्यामुळे यश मिळाले. नांदगावच्या जनतेला दिलेला शब्द मला प्रत्यक्षात उतरवणे शक्य झाले." - आमदार सुहास कांदे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.