CM Eknath Shinde Group News  esakal
नाशिक

Nashik News: शिवसेना शिंदे गटाकडून संघटनात्मक बांधणी! 31 प्रभागांमध्ये 122 शाखाप्रमुख नियुक्त करणार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, तयारीचा एक भाग म्हणून नागरिकांकडून पायाभूत सुविधासंदर्भात सूचना मागविल्या जात आहे.

एकीकडे नागरिकांना शासन निगडित निर्णयांमध्ये सहभागी करून घेत असतानाच दुसरीकडे आता शिवसेनेकडून संघटनात्मक बांधणीला सुरवात झाली असून, त्यासाठी घटस्थापनेच्या पहिल्या माळेचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.

शहरातील ३१ प्रभागांमध्ये प्रत्येकी चार याप्रमाणे १२२ शाखाप्रमुख नियुक्त केले जाणार आहे. प्रत्येक शाखेसाठी सेवा, सुरक्षा व संस्कृती या नवीन ब्रीदवाक्याचा फलक लावणे बंधनकारक केले जाणार आहे. (Organizational construction by Shiv Sena Shinde group 122 branch heads will be appointed in 31 divisions Nashik News)

शाखा फलकावर पदाधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक राहणार असून, मुंबई व ठाण्याच्या धरतीवर नागरिकांना त्वरित मदत पोचविण्याचे नियोजन या माध्यमातून केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य अधांतरी राहिले असून, सर्वच राजकीय पक्ष लोकसभा व त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. त्या तयारीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटाने नाशिकमध्ये कंबर कसली आहे.

पहिल्या टप्प्यात प्रमुख नेत्यांचे व माजी नगरसेवकांचे प्रवेश शहरांमध्ये करून घेण्यात आले. त्यानंतर शिवसेनेकडून विविध आंदोलने करण्यात आली. पायाभूत सेवा व सुविधांच्या संदर्भात महापालिकेच्या बरोबरीला नागरिकांचाही सहभाग करून घेण्यासाठी सोशल मीडियावर नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले.

यात नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत पार्किंगसाठी सोय उपलब्ध करण्याची मागणी केली. ढोल महोत्सव, रील्स महोत्सव, पतंग महोत्सव, भजन स्पर्धा या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल कायम ठेवण्यात आली.

आता संघटनात्मक बांधणीचा भाग म्हणून शहरातील ३१ प्रभागांमध्ये पालकांची नियुक्ती केली जाणार आहे.

सेवा, सुरक्षा व संस्कृती नवे ब्रीद

शिंदे गटाकडून सेवा, सुरक्षा व संस्कृती हे नवे ब्रीदवाक्य निश्चित करण्यात आले आहे. घटस्थापनेच्या पहिल्या माळेपासून शाखा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाखा विस्ताराबरोबरच ३१ प्रभागांमध्ये ३१ पालक नियुक्ती केली जातील.

त्याचबरोबर १२२ शाखाप्रमुखांची नियुक्ती केली जाणार आहे. प्रत्येक प्रभागात एक पालक याप्रमाणे ३१ पालक नियुक्त केले जातील.

त्यांच्याकडे शाखाप्रमुखांचे कामकाज व वर्तणूक या संदर्भातील लेखाजोखा ठेवण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. शाखाप्रमुख संदर्भातील अहवाल त्यांच्या मार्फत वरिष्ठांना कळविले जातील.

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार ८० टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण यानुसार शिवसेनेचे काम सुरू आहे. आता १२२ शाखाप्रमुख सेवा, सुरक्षा व संस्कृती या ब्रीदवाक्यानुसार लोकांची सेवा करतील."- अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamala Harris vs Donald Trump election : डोनाल्ड ट्र्म्प आघाडीवर... पण कमला हॅरिस यांचा कमबॅक शक्य; अंतिम निकाल कधी लागणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Captain David Warner: बंदी हटली अन् डेव्हिड वॉर्नरकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली; ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधून मोठी बातमी

Mumbai Weather Update: येत्या काही दिवसात कसं असेल मुंबईचं तापमान? जाणून घ्या एका क्लिकवर..

Andhari Vidhansabha: ऋतुजा लटके पुन्हा मारणार बाजी की मुरजी पटेल देणार धोबीपछाड? अंधेरी पूर्वेत दोन्ही शिवसेनांमध्ये चुरशीची लढत

SCROLL FOR NEXT