Nashik NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुक्यातील संघटनात्मक पुनर्रचना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली असून, पक्षाचे नवे तालुकाध्यक्ष म्हणून महेंद्र बोरसे यांची त्यांनी नियुक्ती केली आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बांधणी करताना नांदगाव तालुक्यात निष्ठावान कार्यकर्त्यांना सामावून घेण्याच्या धोरणाचा भाग म्हणून अशा प्रकारची पुनर्रचना केली. (Organizational Restructuring of NCP Part of strategy to accommodate loyal activists nashik)
माजी नगराध्यक्ष चेतन पाटील यांच्याकडे शहराच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष नीलेश चव्हाण यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी सेलचे तालुकाध्यक्षपद सोपविण्यात आले, तर सरचिटणीस म्हणून मछिंद्र वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अनिल वाघ यांच्यावर नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे नवे अध्यक्ष म्हणून, तर मनमाडचे शहराध्यक्ष म्हणून सुधीर पाटील यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील संघटनेवर अधिक लक्ष केंद्रित केले असल्याचे सांगत नवीन पदाधिकाऱ्यांवर पक्ष संघटना मजबूत करण्याचे व तळागाळातील जनतेपर्यंत जाऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन या वेळी केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, एकनाथ खडसे, जितेंद्र आव्हाड, माजी आमदार हेमंत टकले, पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, गजानन शेलार, गोकुळ पिंगळे आदी उपस्थित होते.
याशिवाय रणखेडा येथील सरपंच शांताराम शिंदे, परसराम शिंदे, राकेश चव्हाण आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नांदगाव तालुक्यातील पक्ष संघटनेच्या फेरबदलात लक्ष घातल्याने राजकीय वर्तुळात या नियुक्त्यांची चर्चा होताना दिसत आहे .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.