Gurumauli Annasaheb More  esakal
नाशिक

Shri Swami Samarth Gurupeeth : श्री स्वामी समर्थ श्रीगुरुपीठात ‘याज्ञिकी’ प्रशिक्षणाचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा

Shri Swami Samarth Gurupeeth : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या त्र्यंबकेश्वर येथील श्रीगुरुपीठात २३ ते २९ जुलै या काळात सातदिवसीय निवासी याज्ञिकी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. (Organized 7 days residential Yagnik training from 23rd to 29th July at Shri Gurupeeth nashik news)

सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनार्थ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागप्रमुख नितीनभाऊ मोरे यांनी दिली.

नितीनभाऊ यांनी सांगितले, की सेवामार्गाने नेहमी जनहित आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्या हेतूनेच सेवामार्गातर्फे बहुविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. सेवेकऱ्यां‍नाही ‘याज्ञिकी’ म्हणून सेवा करता यावी, या उद्देशाने गुरुमाऊलींच्या आज्ञेने याज्ञिकी प्रशिक्षण घेतले जात आहे. हे प्रशिक्षण विनामूल्य दिले जाणार असून, सहभागी होणाऱ्या सेवेकऱ्यांची निवास आणि भोजनाची व्यवस्था केली जाईल.

सात दिवस संपूर्ण दिवसभर प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाणार आहे. जुलैचा मासिक महासत्संग शनिवारी (ता. २२) होईल. मासिक सत्संगाच्या दुसऱ्या दिवसापासून याज्ञिकी प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे गरजेचे आहे. या प्रशिक्षणांतर्गत अखंड नामजप सप्ताहाचे प्रात्यक्षिक देण्यात येईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सेवामार्गातर्फे दत्त जयंती आणि स्वामी पुण्यतिथीनिमित्त वर्षभर दोन नामजप सप्ताह घेण्यात येतात. त्यावेळी सेवाकेंद्रांमध्ये याज्ञिकींची कमतरता भासते. सहा हजारांहून अधिक सेवाकेंद्रे आहेत. त्यामुळे याज्ञिकींची संख्या वाढावी, सेवेकरी याज्ञिकी बनावेत या भूमिकेतून परमपूज्य गुरुमाऊलींच्या आज्ञेने याज्ञिकी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी सविस्तर माहिती नितीनभाऊ मोरे यांनी दिली.

सेवामार्गात जे याज्ञिकी आहेत आणि याज्ञिकी होण्याची ज्यांची इच्छा आहे, अशा सर्वांनी या प्रशिक्षणात सहभागी व्हावे, असे श्री. मोरे यांनी स्पष्ट केले. इच्छुकांनी आपल्या सोबत श्रीगुरुचरित्र ग्रंथ, श्रीदुर्गा सप्तशती, श्रीस्वामी चरित्र सारामृत ग्रंथ, श्रीविष्णुसहस्रनाम पोथी, गीताई, मनाचे श्लोक, नित्यसेवा ग्रंथ, जपमाळ, पळी, पेला, ताम्हण, आसन, गंध, अक्षता, हळद-कुंकू, यज्ञविधी ग्रंथ आदी साहित्य आणावयाचे आहे.

श्रीस्वामी सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवाप्रबोधन विभागातर्फे नरसोबावाडी, जळगाव येथेही दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी गर्भसंस्कार, शिशुसंस्कार, बालसंस्कार, प्रश्नोत्तरे, वास्तूशास्त्र आदी विषयांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण देण्यात येते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर 10 लाखांचे बक्षिस; कोण आहे अनमोल बिश्नोई?

Diwali 2024: दिवाळीत घराची स्वच्छता करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, काम होईल सोपे

Nagpur East Assembly Election : भाजपच्या ‘कृष्णा’ला अजित पवार गटाच्या आभा यांचे आव्हान, आभा पांडेंकडून अर्ज दाखल

NCP Jalgaon Vidhansabha 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देवकर, खोडपे, खडसेंना उमेदवारी!

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT