नाशिक रोड : येथे सध्या संघटित गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. वडापाव विक्री करणाऱ्या विक्रेत्याला आठ जणांनी कोयत्याने हल्ला करून जखमी केल्यानंतर नाशिक रोड येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय गावठी कट्टे सापडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून हे कट्टे येतात कुठून, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. सामान्य माणसांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाने अवैध धंद्यांवर नियंत्रण आणून पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी केली आहे. (Organized crime increased in Nashik Road Call for strict action Nashik Latest Crime News)
वडापाव विक्रेत्यावर हल्लेखोरांनी हल्ला चढविल्यानंतर देवळाली गाव येथेही दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नाशिक रोड येथे भीतीचे वातावरण पसरले आहे. शिवाय हवेत गोळीबार झाल्याची ही चर्चा सध्या येथे रंगत आहे. म्हणून गावठी कट्टे येतातच कुठून, असा सवाल सध्या नागरिक उपस्थित करीत आहे. येथे गेल्या तीन महिन्यांमध्ये गावठी कट्टे हत्यारे सापडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. विशेष करून अरिंगळे मळा, सिन्नर फाटा, फर्नांडिस वाडी, जयभवानी रोड येथील स्वप्नील बिल्डिंग, रोकडोबावाडीच्या आसपासचा परिसर, देवळाली गाव, गोरेवाडी, स्टेशनवाडी या ठिकाणी आजपर्यंत सर्वाधिक कट्टे सापडल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे.
गावठी कट्टे विकणारी टोळी सध्या नाशिक रोडमध्ये सक्रिय आहे. शिवाय ही टोळी पकडल्यानंतर पुन्हा याच स्वरूपाचे अनेक गुन्हे करत आहे. शिवाय स्टेशनवाडी, सिन्नर फाटा, गोरेवाडी, शिवाजीनगर, एकलहरेच्या आसपासचा परिसर, देवळाली गाव मालधक्का रोड, विहीतगाव या ठिकाणी सध्या टवाळखोरांचा संघटित उच्छाद वाढत आहे. नाशिक रोड येथे असणाऱ्या वेगवेगळ्या मनपाच्या उद्यानांमध्ये टवाळखोर रोज गांजा, मद्य सेवन करून परिसरात उच्छाद निर्माण करत असतात.
हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
अवैध धंद्ये वाढले
नाशिक रोड येथे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मटका, जुगार, लॉटरी बरोबरच उपनगर आणि नाशिक रोडमध्ये असणारे ढाबे रात्री दहानंतर खुले असतात. छुप्या पद्धतीने या ढाब्यांवर दारूविक्री केली जाते. लॉजवरही प्रशासन नियंत्रण न ठेवता काही मालक कोणालाही विनाओळखपत्र सहारा देत असते.
"महिलांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. संघटित गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर पेट्रोलिंग वाढवली पाहिजे. शिवाय रात्री उद्यानात गोंधळ घालणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करायला हवी. यासाठी पोलिस प्रशासनाने सिव्हिल ड्रेसवर गस्त वाढवावी." - श्वेता तुपे, नागरिक
"झोपडपट्ट्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवले पाहिजे. रात्री दहानंतर उघडे असणारे ढाबे, अंडाभुर्जी गाडे यांच्यावर वॉच ठेवायला हवा. रेल्वे स्टेशन, जयभवानी रोड, स्टेशनवाडी, सिन्नर फाट्या जवळचा आसपासचा मळे परिसर या ठिकाणी रात्री पोलिसांनी पेट्रोलिंग मोठ्या प्रमाणावर करायला हवे." - कैलास देवरे, नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.