Indian Medical Association esakal
नाशिक

Nashik News : उद्या ‘ओमनीकॉन 2024’ परिषद आयोजन

इंडियन मेडिकल असोसिएशनच्‍या नाशिक शाखेतर्फे ‘ओमनीकॉन २०२४’ परिषद आयोजित केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : इंडियन मेडिकल असोसिएशनच्‍या नाशिक शाखेतर्फे ‘ओमनीकॉन २०२४’ परिषद आयोजित केली आहे.

रविवारी (ता. ११) सकाळी नऊपासून शालिमार येथील आयएमए सभागृहात ही परिषद पार पडणार असल्‍याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ.विशाल गुंजाळ यांनी दिली. (Organized Omnicom 2024 conference tomorrow from indian medical association nashik news)

पत्रकार परीषदेप्रसंगी आयएमए नाशिकच्‍या सचिव डॉ. माधवी गोरे- मुठाळ, डॉ. किरण शिंदे, डॉ. मिलिंद भराडिया उपस्‍थित होते. परिषदेचे मुख्य समन्‍वयक म्‍हणून डॉ. किरण शिंदे, डॉ. नीलेश जेजुरकर, आयएमए अध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ व सचिव डॉ. माधवी गोरे- मुठाळ काम पाहत आहेत.

डॉ. गुंजाळ म्‍हणाले, परिषदेचा भाग म्‍हणून डॉ. वसंतराव गुप्ते ओरिएशन आयोजित केले आहे. यामध्ये ‘वैद्यकीय शिक्षण आणि त्‍यात होत असलेले बदल’ या विषयावर एसएमबीटीच्‍या अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर मार्गदर्शन करतील. डॉ. माधवी मुठाळ म्हणाल्या, की परिषदेत एकूण १५ सत्राचे आयोजन केले असून, वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी व ज्‍येष्ठ डॉक्‍टर सदस्‍य मार्गदर्शन करतील.

जिल्‍हाभरातून आत्तापर्यंत सातशे डॉक्‍टरांनी नोंदणी केली असून, एक हजार पर्यंत डॉक्‍टर सहभागी होण्याची अपेक्षा आहे. डॉ. किरण शिंदे म्‍हणाले, की परिषदेत विविध विषयांवरील सत्र होतील.

यामध्ये एकविसाव्या शतकातील डॉक्‍टर, वैद्यकीय सेवेचा स्‍तर उंचावण्यासाठीच्‍या तरतूद, वंधत्‍व निवारणाच्‍या क्षेत्रातील आधुनिक उपचार व आयव्‍हीएफची भूमिका, कर्करोगविकार शाखेतील आधुनिक उपचार सुविधा, स्पोर्ट्स एंज्‍युरी व फिटनेस, टॅक्‍सेशन व डॉक्‍टर, डायलिसिस व्‍यवस्‍थापन कौशल्‍ये असे विविध विषयांवर सत्र आयोजित केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT