Nashik News : कांदा दरातील सततच्या घसरणीमुळे उत्पादक शेतकरी गेले वर्षभर अश्रू ढाळत होता. खर्चही निघू शकत नसल्याने मातीमोल भावानेकांदा विकावा लागत होता, तेव्हा केंद्र सरकार कुठे गेले होते? आता जेमतेम खर्च निघेल एवढाच दर मिळू लागला असताना दहाच दिवसात निर्यातशुल्क वाढवून केंद्राने त्यावरही पाणी फिरविले आहे.
ही अघोषित निर्यातबंदीचा असून शुल्कवाढ मागे घेतली जात नाही तोवर कांदा लिलाव बंदच राहतील असा सणसणीत इशारा आज जिल्ह्यातील कांदा उत्पादकांनी दिला. केंद्राच्या घोषणेच्या निषेधार्थ आज जिल्ह्याभर रास्तारोको, ठिय्या आंदोलन आणि घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांनी आंदोलनाची धार वाढविली आहे.
दरम्यान आज लिलाव बंद राहिल्याने कांदा खेरदी विक्रीचे सुमारे चाळीस कोटींचे व्यवहार ठप्प झाले. (outbreak of increase in export duty in district protests at various places in nashik district)
कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क वाढीमुळे परदेशात कांदाचे दर वधारले आहेत,मात्र त्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या लासलगावमध्ये आज कांदा विक्री होऊ शकली नाही.
दुसऱ्या क्रमांकाच्या पिंपळगांव बसवंत बाजार समितीत कांदा लिलावा दरम्यान शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करून केंद्राचा निषेध केला. शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून बाजार समिती आवार दणाणून सोडले.
येवला येथे शेतकऱ्यांना तीव्र संताप व्यक्त करीत ३००-४०० रूपये दराने विकला, तेव्हा सरकार झोपले होते का? आता दोन रुपये मिळू लागताच निर्यात मूल्यात वाढ करून शेतकऱ्यांना संकटाच्या खाईत लोटले आहे, असा आरोप करीत शेतकरी संघटनेतर्फे महामार्गावर रास्तारोको करण्यात आला.
निफाड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे प्रांत कार्यालयावर धडक देऊन घोषणाबाजी करण्यात आली. विंचूर (ता.निफाड) येथेही महामार्गावर शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करीत तीव्र संताप व्यक्त केला.
देवगाव (ता.निफाड) येथे शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्यातशुल्क वाढीच्या निर्णयाच्या अध्यादेशाची होळी केली. वणी (ता. दिंडोरी), चांदवडसह बागलाण तालुक्यातही आंदोलने करण्यात आली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
केंद्राने ४० टक्के निर्यात शुल्कचा घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी निफाडचे आमदार, तथा पिंपळगाव बाजारसमितीचे सभापती दिलीप बनकर यांनी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीताराम, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ,खासदार सुप्रिया सुळे आदींकडे पत्राद्वारे केली आहे.
लासलगावात कोटीचे व्यवहार ठप्प
लासलगाव : कांद्याचे लिलाव न झाल्याने आशिया खंडातील कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीचे फक्त कांद्याचे पाच कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
जिल्ह्यातील पंधरा बाजार समिती यांनी 40% निर्यात शुल्क मागे घेण्यासाठी सोमवारपासून बेमुदत बंद पुकारला आहे. लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली.
श्री. मुंडे यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारींना बाजार समितीच्या सभापतींची तातडीची मंगळवारी (ता.२२) बैठक आयोजित केली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशीही मुंडे यांनी चर्चा केली असून कांदारप्रश्नी तात्काळ लक्ष घालून सोडवण्यासंदर्भात विनंती केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.