इंदिरानगर (जि. नाशिक) : तीन वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर पुणे रोडवरून द्वारका चौक ऐवजी वडाळा गाव, इंदिरानगर मार्गे वळविलेली अवघड वाहनांची वाहतूक आता कायमस्वरूपी झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. ही वाहतूक बंद न झाल्यास जनआंदोलनाचे संकेत परिसरातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून मिळत आहेत. यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष रमीज पठाण यांनी पुढाकार घेतला असून, सोशल मीडियाद्वारे या प्रश्नाबाबत जनजागृती करण्यास सुरवात केली आहे. (Outcry against heavy traffic All party functionaries gathered at Indiranagar Nashik News)
अवघड वाहनाची वाहतूक सम्राट हाऊस पासून डीजीपीनगर, वडाळा गाव चौफुली, साईनाथ चौफुली तसेच वडाळा गावातील शंभर फुटी रस्त्याने पुढे वडाळा- पाथर्डी रस्ता या इंदिरानगरच्या मुख्य रस्त्याने थेट पाथर्डी फाटा मार्गे मुंबईकडे वळविली आहे. हा सर्व परिसर दाट लोकवस्तीचा असल्याने अनेक गंभीर अपघात या वाहनांमुळे झाले आहेत. याबाबत नागरिक तसेच पठाण यांच्यासह माजी महापौर सतीश कुलकर्णी, माजी नगरसेवक सतीश सोनवणे, ॲड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, डॉ. दीपाली कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, सुनील खोडे, रूपाली निकुळे, यशवंत निकुळे, शाहीन मिर्झा आदींनी पोलिस आयुक्त आणि वाहतूक शाखेकडे अनेकदा निवेदने दिली.
पर्यायी मार्ग काढून काहीतरी व्यवस्था करू, असे आश्वासन दिले, मात्र ही वाहतूक तशीच आहे. परिसरात मोठी मंदिरे आहेत. येथे नेहमीच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा राबता असतो. याशिवाय शाळा आणि महाविद्यालये आहेत. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी येथे येतात. या विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या व्हॅन येथे असतात. दुर्दैवाने अवजड वाहनांचा ताबा सुटला तर कोणत्याही क्षणी येथे भीषण अपघाताची शक्यता आहे. यापूर्वी देखील गॅस टँकरचे दोन अपघात या ठिकाणी झाले होते.
हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....
लवकरच बैठक
प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने आता या भागातील सर्वपक्षीय माजी नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी आता एकवटले आहेत. लवकरच याबाबत एकत्रित बैठक घेतली जाणार आहे. उपरोक्त सर्वांसह देवानंद बिरारी, ऋषिकेश वर्मा, प्रवीण जाधव, आकाश खोडे, नीलेश साळुंखे, सागर देशमुख, ॲड. अजिंक्य गिते, गणेश जाधव, कपिल मंडलिक, प्रकाश खोडे, जय कोतवाल, संकेत खोडे, आसिफ शेख, सुनील उन्हाळे, ईश्वर पवार, रोहित पवार, अमित काकडे, आशिष चिडे आदींसह सर्वच भागातील सर्वपक्षीय युवक, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक मंडळे आता या प्रश्नावर एकवटले आहेत.
"या अवजड वाहनांची मोठी समस्या या भागात झाली आहे. ज्येष्ठ नागरिक महिला आणि विद्यार्थी सर्वांनाच जीव मुठीत घेऊन रस्त्याने चालावे लागत आहे. त्यामुळे आता या प्रश्नावर सर्वांनी एकत्र येऊन आरपारची लढाई करण्याचा निर्णय घेतला आहे."- रमीज पठाण
"या प्रश्नावर विविध ठिकाणी निवेदने दिली. हा प्रकार किती धोक्यात आहे, याबाबतची विस्तृत माहितीदेखील दिली. मात्र, संबंधित यंत्रणेकडून कोणतीही पावले उचलले जात नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळे आता हा प्रश्न जन आंदोलनाद्वारे तडीस नेण्यासाठी सर्वांसोबत एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे."- ॲड. श्याम बडोदे, माजी नगरसेवक
"हजारोंच्या संख्येने विद्यार्थी शहरातून या भागात येतात. अनेक विद्यार्थी सायकलद्वारे, तर अनेक जण पायी येतात. या वाहनांमुळे सातत्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ही अवजड वाहतूक तातडीने या भागातून बंद झाली पाहिजे."- शरद गिते, मुख्याध्यापक, डे केअर शाळा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.