Grapes esakal
नाशिक

नाशिक : कृषी पंढरीच्या उत्पादनावर एक दृष्टीक्षेप!

कृषी पंढरी, द्राक्ष पंढरी, मुंबईची भाजीपाल्याची परसबाग, पुष्पोदननगरी, कांदा अन डाळिंब उत्पादक पट्टा अशी विविध बिरुदं मिरवणाऱ्या नाशिक जिल्ह्याचा एक दृष्टीक्षेप.

महेंद्र महाजन : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कृषी पंढरी, द्राक्ष पंढरी, मुंबईची भाजीपाल्याची परसबाग, पुष्पोदननगरी, कांदा अन डाळिंब उत्पादक पट्टा अशी विविध बिरुदं मिरवणाऱ्या नाशिक जिल्ह्याचा एक दृष्टीक्षेप. फलोत्पादनाच्या ९२ हजार २९२ हेक्टरमधून १६ लाख ४८ हजार ३०० टन, तर फळ व भाजीपाल्याच्या ५१ हजार २०५ हेक्टरमधून ७ लाख ८९ हजार ११८ टन उत्पादन होते. पुष्पोत्पादनाचे ८५१ हेक्टर क्षेत्र आहे. विशेष म्हणजे, फलोत्पादनाचे आणि भाजीपाल्याचे क्षेत्र सर्व तालुक्यांमध्ये विस्तारले आहे. कृषी विभागाकडे असलेल्या नोंदीवरुन हे चित्र पुढे आले आहे. (Latest Marathi News)

तालुकानिहाय फलोत्पादनाचे आणि फळ-भाजीपाल्याचे क्षेत्र हेक्टरमध्ये अनुक्रमे पुढीलप्रमाणे : नाशिक-७ हजार ३८२.४७०-५ हजार ५०२.९०, इगतपुरी-२९९.८१०-२ हजार ३०८.१५, पेठ-१ हजार २१९.८५०-५८७.१०, त्र्यंबकेश्‍वर-८१८-२२-.१०, निफाड-२४ हजार ८७१.५०-३ हजार ९५.८०, सिन्नर-३ हजार ८४३.८०-११ हजार ९००.३०, येवला-९१०-१ हजार ८८८, चांदवड-६ हजार ८९३.४८-६ हजार ३३४, मालेगाव-११ हजार २१-७५८, बागलाण-११ हजार ६४४-८९६, नांदगाव-२०५-२३४, कळवण-२४०-४३४, दिंडोरी-१९ हजार ५९१.१६-१६ हजार ७४६, सुरगाणा-२ हजार १७१-१४२.७०, देवळा-१ हजार १८०.१०-१५८.९०. याशिवाय दिंडोरी तालुक्यात फुलांचे २७३.४० हेक्टरवरील पुष्पोत्पादनातून १३ कोटी ६४ लाख फुलांचे उत्पादन शेतकरी घेतात. मोहाडी आणि जानोरीचा परिसर पुष्पोत्पादनाच्यादृष्टीने ‘पॉलीहाऊस'नगरी म्हणून नावारुपाला आला आहे.

याशिवाय नाशिक तालुक्यात १९४.९०, चांदवडमध्ये ३८३ हेक्टरवर फुलांची शेती केली जाते. काजूचे इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्‍वर, सुरगाणा तालुक्यात १ हजार ८६० हेक्टर क्षेत्र असून त्यातून २ हजार २७० टन काजूचे उत्पादन घेतले जाते. त्यात इगतपुरीमधील २९.२८, पेठमधील ३२०.१३, त्र्यंबकेश्‍वरमधील १५१.२८, सुरगाण्यातील १ हजार ७६९ टन उत्पादनाचा समावेश होतो. शिवाय बागलाण तालुक्यात ३ आणि देवळा तालुक्यात १ हेक्टरवर नारळाची लागवड झाली आहे. दरम्यान, लसणाची येवल्यात ८१, नांदगावमध्ये ४२ अशी एकुण १२३, आल्याची निफाडमध्ये २३.५०, येवल्यात ७, चांदवडमध्ये ६, नांदगावमध्ये ३० अशी एकुण ६६.५०, लाल मिरचीची येवल्यात ७, चिंचची येवल्यात ८, नांदगावमध्ये ३ अशी एकुण ८, हळदीची निफाडमध्ये ५, नांदगावमध्ये ६, सुरगाण्यात ७ अशी एकुण १८ हेक्टरवर लागवड झालेली आहे.

फुलशेतीची स्थिती
कार्नेशनची नाशिक तालुक्यात ११.५०, शेवंतीची नाशिकमध्ये ४.५०, चांदवडमध्ये २, दिंडोरीत ५७ अशी एकुण ६३.५०, जर्बेराची नाशिकमध्ये ०.६०, दिंडोरीत ०.२० अशी एकुण ०.८०, ग्लॅडिओलसची नाशिकमध्ये ०.६०, दिंडोरीत ०.२० अशी एकुण ०.८०, जाईची नाशिकमध्ये ०.१०, चमेलीची नाशिकमध्ये ०.१०, लिलीची नाशिकमध्ये ०.२०, झेंडुची नाशिकमध्ये १६५, येवल्यात ३१०, चांदवडमध्ये ३७६, दिंडोरीत ८० अशी एकुण ६५२, गुलाबची नाशिकमध्ये १०, येवल्यात १, चांदवडमध्ये ५, दिंडोरीत १३६ अशी एकुण १५२, निशीगंधाची नाशिकमध्ये २.५०, मोगराची सुरगाण्यात ५ हेक्टरवर शेतकऱ्यांनी लागवड केली आहे.

दिंडोरीत शेवंतीच्या ५७ हेक्टरमधून २७० टन, जर्बेराचे नाशिकमध्ये ०.६० हेक्टरमधून १२ लाख, तर दिंडोरीत ०.२० हेक्टरमधून ४ लाख फुलांचे, ग्लॅडिओलसचे नाशिक तालुक्यात ६० हजार, तर दिंडोरीत २० हजार फुलांचे, झेंडुचे दिंडोरी तालुक्यात ४८० टन आणि गुलाबाचे १३ कोटी ६० लाख फुलांचे उत्पादन होते. मात्र जंगल संपत्तीचे कोंदण लाभलेल्या सुगंधी आणि औषधी वनस्पतींची नेमक्या किती क्षेत्रावर लागवड झाली आहे आणि किती उत्पादन मिळते, याची आकडेवारी कृषी विभागाकडे उपलब्ध नाही.

फलोत्पादनाचे क्षेत्र आणि उत्पादन
(आकडे क्षेत्राचे हेक्टरमध्ये आणि उत्पादन टनामध्ये)
फळपीक क्षेत्र उत्पादन
आवळा १४.७० ११७.६०
केळी ३४ ६८
बोरे ४६.११ ३६.८८
स्ट्रॉबेरी १४० २ हजार १००
सीताफळ ३१०.६५ २ हजार ३८२.६८
द्राक्षे ५८ हजार ४१८.२४ ११ लाख ६८ हजार ३८४.८

पेरु १ हजार ५७१.१५ १४ हजार ३७६.२२
लिंबू २१२.७६ १ हजार १९९.९१
आंबा ४ हजार ९३४.८६ ७ हजार ८९०.८४
पपई २६.६० १ हजार २७९.१९
डाळिंब २६ हजार ५८ ४ लाख ४३ हजार.२८
चिकू ३०२.०३ २ हजार ९६२.९१
मोसंबी ५ २१.२५
कलिंगड १५० ४ हजार ५००
इतर फळे ६६.७५ -

भाजीपाल्याचे क्षेत्र आणि उत्पादन
(क्षेत्र-हेक्टरमध्ये, तर उत्पादन-टनामध्ये)
फळभाज्या-भाजीपाला क्षेत्र उत्पादन
घेवडा १ हजार ५५७.५० १७ हजार ७६८.३३
वांगी २ हजार ७९९.२५ ३० हजार २३४.११
गाजर ५७९ ४ हजार ३५०.९२
बीट ३९.९० ४५
ब्रोकोली (चांदवड) ४ ७६
फुलकोबी ३ हजार २८९.८० ३७ हजार ८७१.४६
कारले १ हजार २०५.६० ५ हजार ८५६.८६
कोबी ४२३.८० ५८ हजार १२९.८४
काकडी १ हजार १५८.८० ९ हजार ८६.९३
दुधीभोपळा १ हजार ४५०.९० ३४ हजार ४४८.८५
ढोबळी मिरची ७९०.१० १ हजार ७३३.५५

हिरवी मिरची १ हजार २२४.९ ७ हजार ११.३०
हिरव्या पालेभाज्या ८ हजार ९८.४० ६६ हजार ५६४.५८
भेंडी १ हजार ३८१.४० १२ हजार १४.३२
वाटाणा १ हजार ६६४.५० २ हजार ७२१.५७
बटाटा १०२.६० १ हजार ८४०.०९
मुळा २२१.३० ४ हजार२६५.३९
दोडका ९८७.६० १२ हजार ४६७.३६
टोमॅटो २० हजार १९४.१० ४ लाख ८२ हजार ६६२.२२
इतर भाजीपाला ३३.५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT