CRIME esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : भिकाऱ्याला दाखविले चक्क जमिनीचा मालक; 5 संशयितांना अटक

शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात भिकाऱ्याला जमीन मालक दाखवून वृद्धाचे बनावट मुखत्यारपत्र बनवून पावणेपाच लाखाची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात भिकाऱ्याला जमीन मालक दाखवून वृद्धाचे बनावट मुखत्यारपत्र बनवून पावणेपाच लाखाची फसवणूक व जमीन बळकावण्याच्या प्रकरणात छावणी पोलिसांनी शिताफीने तपास करून अवघ्या दोन दिवसात सातपैकी पाच जणांना अटक केली आहे.

यात जमीन मालक बनलेल्या तोतया भिकाऱ्याचाही समावेश आहे. (owner of land shown to beggar arrested 5 suspected nashik fraud crime news)

शहरातील ताश्‍कंद बाग भागातील अशरफ तन्वीर शब्बीर हकीम (६५, रा. ताश्‍कंद बाग) याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात सात जणांसह तोतया जमीन मालक बनल्याविरुध्द ठकबाजीचा गुन्हा दाखल केला होता. अशरफ तन्वीर यांच्या मालकीची सोयगाव शिवारातील सर्व्हे नं. ९, प्लॉट नं. २ संपूर्ण क्षेत्र १८६.०० चौरस मीटर ही मिळकत खोटे पॅन कार्ड बनवून व तोतया इसम उभा करून खोटा दस्त तयार करण्यात आले.

इसरार अहमद निहाल अहमद याचे नावे स्पेशल मुखत्यार पत्र नोंदवून दिले. अशरफ तन्वीर यांचा फोटो व सह्या बनावट करून सदरचे बनावट मुखत्यारपत्र बनविले. त्याच्या आधारे २१ ऑगस्ट २०२३ ला लखन विनोद यादव याच्या नावे खरेदीखत नोंदवून दिले आहे. साक्षीदार म्हणून हरीलाल आधार निकम व साजिद अहमद कमरुद्दीन मोमीन यांच्या सह्या आहेत. या सर्वांनी हा प्लॉट ४ लाख ७५ हजाराला परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

२४ मे २०२३ ते २१ ऑगस्ट २०२३ दरम्यान येथील दुय्यम निबंधक कार्यालयात हा प्रकार घडला. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अशरफ हकीमच्या नावाने उभा झालेला तोतया, इसरार निहाल अहमद, शाहीद इकबाल अहमद, अफजल साहेब खान, लखन यादव, हरीलाल निकम, साजिद अहमद कमरुद्दीन मोमीन यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला होता.

पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, अप्पर अधिक्षक अनिकेत भारती, सहाय्यक अधिक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर, उपनिरीक्षक भगवान कोळी, सचिन चौधरी, हवालदार शरद भुसनर, पोलिस नाईक कैलास चोथमल, प्रसाद देसले, शांतिलाल जगताप, विलास बागडे

संदीप राठोड आदींनी या प्रकरणी तातडीने चौकशी करून बनावट मुख्त्यार पत्र तयार करणारे इसरार निहाल अहमद, साजिद अहमद कमरुद्दीन मोमीन, शफीक अहमद सरताज हुसेन तसेच खरेदी खत नोंदवून घेतलेले लखन विनोद यादव, भिकारी असलेला तोतया जमीन मालक अब्दुल रहेमान महम्मद सुलेमान या पाच जणांना अटक केली. कारवाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे श्री. उमाप यांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT