नाशिक : ऑक्सिजन टंचाईवर मात करण्यासाठी रेल्वेने ऑक्सिजन टँकर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिकसाठी शनिवारी (ता.२४) ऑक्सिजन टँकर घेऊन येणारी एक्स्प्रेस येथील मालधक्क्यावर दाखल झाली आहे. देशात आणि राज्यात ऑक्सिजन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन पुरविण्याची सोय केली आहे. विशाखापट्टणमहुन ऑक्सिजन एक्स्प्रेस नाशिक रोड स्थानकात दाखल झाली असून नाशिककरांसाठीचा ऑक्सिजन शॉर्टफौल प्रश्न काही दिवस मार्गी लागेल अशी आशा बाळगण्यात येत आहे.
नाशिककरांसाठीचा ऑक्सिजन शॉर्टफौल प्रश्न काही दिवस मार्गी लागेल
त्यानुसार गुरुवारी (ता. २२) पहाटे राज्यात कोळंबली येथे सात टँकर पोचले. त्यानंतर आता पुन्हा विझाग स्टीलमधून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन टँकर घेऊन एक्स्प्रेस निघाली . विशाखापट्टणम येथून दोन दिवसांपासून रेल्वेने ऑक्सिजन पाठविण्याची तयारी सुरू आहे. रेल्वेद्वारे विविध भागात ऑक्सिजन पाठवत सोय केली जात आहे. राज्यात नाशिकसह सगळीकडे ऑक्सिजनचा तुटवडा आहे. शनिवारी साधारण १०८ टनाचा ऑक्सिजन टँकर नाशिकला पोहचली.
टँकर शहरातील विविध रुग्णालयासाठी
नाशिकला ऑक्सिजनचा मोठा तुटवडा असून, वाढीव ऑक्सिजनची मागणी करण्यात आली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विझाग येथून महाराष्ट्रात रवाना झाली. पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विझाग येथून महाराष्ट्रात रवाना झाली. त्यानुसार साधारण ३१ तासांत नाशिकला आज (ता.२४) ऑक्सिजन टँकर घेउन येणारी एक्स्प्रेस दाखल झाली. सकाळी नाशिक रोडला रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे गुड शेड भागात सिंगल लाइनद्वारे ही एक्स्प्रेस लोड करून ऑक्सिजन टँकर भरून तेथून मालधक्क्यावरून हे टँकर शहरातील विविध रुग्णालसाठी ऑक्सिजन पुरवतील.
प्रकल्पांमध्ये साठा करण्याचा जिल्हाधिकारींचा निर्णय
देवळाली गावातील मालधक्का येथे विशाखापट्टणमहून येणाऱ्या ऑक्सिजन एक्स्प्रेसने नाशिक आणि नगरसाठी प्रत्येकी दोन ऑक्सिजन टँक उपलब्ध होतील. २५ किलोलिटरच्या दोन ऑक्सिजन टँकरमुळे ५० मेट्रीक टन ऑक्सिजन एकाच दिवशी न वापरता, प्रकल्पांमध्ये साठा करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काल (ता.२३) घेतला. ऑक्सिजन एक्स्प्रेस शनिवारी (ता. २४) सकाळी नऊला नाशिक रोड रेल्वेस्थानकात आली. मांढरे यांनी रेल्वे मार्गाची पाहणी केली. त्यानंतर ते म्हणाले, की एक्सप्रेसतर्फे प्राप्त होणारा ऑक्सिजन हा आपल्या जिल्ह्यातील ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यास आपणास मदत होणार आहे. गेल्या काही दिवसात आपणास ८५ मेट्रिक टन ऑक्सिजनऐवजी ५६ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त होत होता. यातील तफावत येणाऱ्या अधिकच्या ५० मेट्रिक टन ऑक्सिजन टँकरमुळे भरून निघणार आहे. तसेच, साठवणूक करून ठेवण्यात आलेल्या ऑक्सिजनचा वापर अतिआवश्यक वेळेत केला जाईल. रेल्वेमार्गे येणाऱ्या ऑक्सिजन टॅंकच्या रेल्वेसाठी दोन मोबाईल व्हॅन या ट्रकवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुंबईहून सहा ते सात टँकर लिक्विड ऑक्सिजनचे आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.