Actor Chinmoy Udgirkar speaking at the prize distribution ceremony of the Maharashtra Workers' Kalyan Mandal Nadya Mahotsav on Tuesday esakal
नाशिक

Kamgar Kalyan Natya Spardha : कामगार नाट्य स्‍पर्धेत पाचोरा केंद्राचे ‘मडवॉक’ प्रथम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र कामगार कल्‍याण मंडळाच्‍या नाशिक विभागातर्फे झालेल्‍या ६८ व्‍या नाट्य महोत्‍सव प्राथमिक स्‍पर्धेत पाचोरा कामगार कल्‍याण केंद्राने सादर केलेल्‍या ‘मडवॉक’ ने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मंगळवारी (ता. २४) सातपूर येथील कामगार कल्‍याण भवन येथील सभागृहात झालेल्‍या कार्यक्रमात सिनेअभिनेता चिन्‍मय उदगीरकर याच्‍या हस्‍ते विजेत्‍यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. (Pachora Kendra Mudwalk First in Kamgar Kalyan Natya Spardha nashik news)

पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी डब्‍ल्‍यूएनएस ग्‍लोबल सर्व्हिसेसचे वरिष्ठ महाव्‍यवस्‍थापक अरविंद कुलकर्णी, करन्‍सी नोट प्रेस, संघटनेचे सरचिटणीस जगदीश गोडसे, अखिल भारतीय नाट्य परिषद नाशिक शाखेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, प्रभारी सहाय्यक कल्‍याण आयुक्‍त भावना बच्‍छाव, स्‍पर्धेचे परीक्षक सतीश कोठेकर, रवींद्र कटारे, रूपाली देशपांडे-नाईक आदी उपस्‍थित होते.

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात श्रीमती बच्‍छाव म्‍हणाल्‍या, की यावर्षी विक्रमी २४ संघ स्‍पर्धेत सहभागी झाले होते. वाढता प्रतिसाद लक्षात घेता, यावर्षीचा विक्रम मोडून पुढील वर्षी आणखी चांगल्‍या संख्येने संघ सहभागी होतील, यासाठी प्रयत्‍न करुया.

श्री.गोडसे म्‍हणाले, की कामगारांना त्‍यांच्‍या दैनंदिन कामकाजासोबत विरंगुळा तसेच कलागुण सादरीकरणास व्‍यासपीठ देणारी ही स्‍पर्धा आहे. सातत्‍याने नवनवीन प्रयोग सादर होत असल्‍याचे समाधान वाटते.

परीक्षकांपैकी श्री. कोठेकर म्‍हणाले, की नाटकाला कलारसिकांची दाद मिळाल्‍यास कलावंतांना प्रोत्‍साहन मिळत असते. अत्‍यंत दर्जेदार नाटकांचे सादरीकरण स्‍पर्धेदरम्‍यान झालेले असतांना, विजेत्‍यांची निवड करतांना कस लागला. सर्व परीक्षकांनी मिळून एकमताने विजेत्‍यांची निवड केली आहे.

नाटक सदैव टिकून राहील : उदगीरकर

सध्या अगदी काही सेकंदांच्‍या रिल्‍सपासून तर चित्रपट, लघुपट, वेब सिरीज अशी मनोरंजनाची भरपूर साधने उपलब्‍ध झालेली आहे. परंतु भविष्यात या साधनांकडे रसिक वळतील किंवा नाही परंतु कसदार अशा नाटक क्षेत्र सदैव टिकून राहील, असे मत अभिनेता चिन्‍मय उदगीरकर याने व्‍यक्‍त केले. तो म्‍हणाला, की पारितोषिक मिळविण्यासाठी नव्‍हे आनंद मिळविण्यासाठी स्‍पर्धेत सहभागी होण्याचा सल्‍ला त्‍याने दिला.

६८ व्‍या नाट्य महोत्‍सवाचा निकाल असा-

प्रथम- मडवॉक (कामगार कल्‍याण केंद्र पाचोरा)

द्वितीय- शक्‍ती शिवाचा तेजोगोल (कामगार कल्‍याण केंद्र देवळाली गाव)

तृतीय- चांदणी (कामगार कल्‍याण केंद्र गांधीनगर वसाहत नेहरूनगर).

उत्तेजनार्थ१- आर्यमा उवाच (कामगार कल्‍याण केंद्र, प्रिंप्राळा जळगाव)

उत्तेजनार्थ२ः शीतयुद्ध सदानंद (कामगार कल्‍याण भवन सातपूर)

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

उत्‍कृष्ट अभिनय (पुरुष)

(कंसात भूमिका व नाटकाचे नाव)

प्रथम- अमोल थोरात (तारकासूर, शक्‍ती शिवाचा तेजोगोल)

द्वितीय- वैभव मावळे (बेन्‍जामीन, मडवॉक)

तृतीय- धनंजय गोसावी (श्रीरंग, शीतयुद्ध सदानंद)

उत्तेजनार्थ- दिलीप काळे (बाप, चांदणी), दीपक भट (ताजोमारो, राशोमान), पंकज बारी (बबन, काय डेंजर वारा सुटलाय), शरद भालेराव (दिशा, दिशा), राजेश टाकेकर (कॅलिबन, चेटुकवार), अमोल ठाकूर (रंगराव, मुसक्‍या), शुभम सपकाळे (आर्यमा, आर्यमा उवाच), सचिन रहाणे (मुकुंद, उदकशांत), गोपाळ जगताप (बॅरिस्‍टर, अखेरचा सवाल), गणेश सोनार (बालण्णा, पुन्‍हा सलवा जुडुम),

उत्‍कृष्ट अभिनय (महिला)

प्रथम- अनुजा देवरे (आई, चांदणी),

द्वितीय- मोक्षदा लोखंडे (श्‍यामीनी, आर्यमा उवाच),

तृतीय- स्‍वप्‍ना लिंबेकर (किनुमे, राशोमान).

उत्तेजनार्थ- माधुरी पाटील (मुलगी, फायनल ड्राफ्ट), अलका गांगुर्डे (डॉ.मुक्‍ता, अखेरचा सवाल), श्रद्धा पाटील (नर्स, शीतयुद्ध सदानंद), रुतुजा घाटगे (चारुबाला, पळा पळा पुढे कोण पळतो), अंकिता मुसळे (कविता, फ्रेंडशिप).

उत्‍कृष्ट दिग्‍दर्शन-

प्रथम- दिनेश माळी (मडवॉक),

द्वितीय- वरुण भोईर (शक्‍ती शिवाचा तेजोगोल)

तृतीय- रोहित पगारे (चांदणी)

उत्‍कृष्ट नेपथ्य-

प्रथम- किरण भोईर (शक्‍ती शिवाचा तेजोगोल)

द्वितीय- चंद्रकांत जाडकर (चेटुकवार)

तृतीय- प्रज्ञा बिऱ्हाडे (मडवॉक)

उत्‍कृष्ट पार्श्वसंगीत-

प्रथम- तेजस बिल्दीकर (क्रकचबंध),

द्वितीय- दीपक महाजन (मडवॉक)

तृतीय- वरुण भोईर (शक्‍ती शिवाचा तेजोगोल)

उत्‍कृष्ट प्रकाश योजना-

प्रथम- चेतना गायधनी (शक्‍ती शिवाचा तेजोगोल)

द्वितीय- विनोद राठोड (चेटुकवार)

तृतीय- अभिषेक कासार (मडवॉक)

उत्‍कृष्ट नाट्यलेखन-

प्रथम- हेमंत कुलकर्णी (मुसक्‍या)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT