Nashik Agriculture News : पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात यंदाच्या हंगामात हाराकिरी केली असली, तरी वेळेवर पुनरागमन झाल्याने शेतकरीवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. इगतपुरी तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे भात शेतीच्या कामांना वेग आला आहे. ( paddy cultivation activities have sped up igatpuri nashik news)
गेल्या चोवीस तासांत पुन्हा एकदा जोरदार वृष्टी झाली असून तब्बल १०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वत्र पडलेल्या दमदार पावसाने भात शेतीला वेग आला आहे. पूर्व भागात पावसाचा जोर वाढल्याने बळीराजा सुखावला आहे. तर तालुक्यात भात शेतीसाठी दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.
इगतपुरी तालुक्यात पावसाने दुसऱ्या टप्प्यात चांगलीच मुसंडी मारून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. गेल्या चोवीस तासांत इगतपुरी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने या परिसरातील शेतात पाणी साचले आहे. इगतपुरी तालुक्यात आजपर्यंत ८८१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान या पावसामुळे सर्वच घटकांना दिलासा मिळाला आहे.
इगतपुरी शहरात धुक्याचे साम्राज्य
पावसाच्या माहेरघरात पावसाने चौफेर फटकेबाजी करीत वातावरण बदलून टाकले आहे. पावसाच्या जोरदार सरी तर मध्येच धुके दाटत असल्याने आल्हाददायक वातावरणाची अनुभूती येत आहे. या वातावरणाचा अनुभव आणि धुक्यात मिसळून जाण्यासाठी पर्यटक दाखल झाले आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्र्यंबकेश्वरमध्ये पर्यटकांची वाढली गर्दी
येथेही सलग संततधार सुरू आहे. सध्याच्या दिवसात व्रत वैकल्य नसल्यामुळे भाविकांऐवजी पर्यटकांची गर्दी होत आहे. पर्यटकांनी त्र्यंबकराजाच्या चरणी लीन झाल्यानंतर तालुक्यातील निसर्ग पर्यटन अनुभवण्यासाठी कूच केली आहे. निसर्ग पर्यटनाचा मनमुराद आनंद पर्यटक घेताना दिसून येत आहेत.
पहिनेत पर्यटकांची गर्दी
या भागात पाऊस पुन्हा सुरू होताच पहिने बारीतील सौंदर्य बहरू लागले आहे. त्र्यंबकला भेट देणाऱ्या पर्यटकांचा ओघ आता पहिने बारीकडे वाढला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.