Officials of 'Aima' and 'GTTCI' on the occasion of MoU esakal
नाशिक

Nashik News: नवीन तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक : पांचाळ

‘आयमा’- ‘जीटीटीसीआय’ मध्ये सामंजस्य करार

सकाळ वृत्तसेवा

सातपूर : नाशिकच्या निर्यातीला अधिक चालना मिळावी तसेच जागतिक स्तरावर उद्योग वाढावा आणि भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यास नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्यक आहे.

त्यासाठी ग्लोबल ट्रेड ॲन्ड टेक्नॉलॉजी कौन्सिल ऑफ इंडियाने (जीटीटीसीआय) सुचवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब केल्यास यश निशितच पदरात पडेल, असे प्रतिपादन आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी केले. (Panchal statement at MoU between AIMA GTTCI Need to use new technology Nashik News)

आयमा सभागृहात आयमा आणि ग्लोबल ट्रेड ॲन्ड टेक्नॉलॉजी कौन्सिल ऑफ इंडियाच्या पदाधिकारी व सदस्यांची परस्पर संवाद बैठक पार पडली त्या वेळी पांचाळ बोलत होते.

व्यासपीठावर नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, आयमाचे सरचिटणीस ललित बूब, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, प्रदीप पेशकर, डेटामार्कचे क्रिस अरकरेसी, ट्रेड ॲन्ड टेक्नॉलॉजी ऑफ इंडियाचे फाउंडर प्रेसिडेंट डॉ. गौरव गुप्ता, ऐश्वर्या वानखेडे, फाउंडर प्रेसिडेंट, जीटीटीसीआय (महाराष्ट्र चॅप्टर), निपमचे अध्यक्ष प्रकाश बारी, कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे, सचिव गोविंद झा, योगिता आहेर आदी होते.

निर्यातवाढीसाठी आयमाने उचललेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन पांचाळ यांनी नाशिकचा इतर देशांशी परस्पर उद्योग वाढावा यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहितीही अवगत केले.

निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी नाशिकच्या उद्योग विस्ताराची आणि येथे येऊ घातलेल्या विविध नवीन प्रकल्पांची माहिती दिली. उद्योग वाढीसाठी नाशिकला मोठा वाव असल्याचे प्रदीप पेशकर आपल्या भाषणात म्हणाले.

जीटीटीसीआयचे अध्यक्ष डॉ. गौरव गुप्ता यांनी जीटीटीसीआयच्या कार्याची माहिती दिली. भारत आणि जगातील इतर राष्ट्रांच्या परस्पर व्यापाराला चालना देणे तसेच व्यवसायाच्या देवाणघेवाणीसाठी लाभदायक वातावरण निर्मिती करणे हा आमच्या उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जीटीटीसीआयच्या महाराष्ट्र चॅप्टर अंतर्गत पुणे, नाशिक, मुंबई आणि नागपूर येथे शाखा विस्तार करण्यात आला आहे. या वेळी आयमा आणि जीटीटीसीआय यांच्यात परस्पर समन्वय करार झाला. उद्योगवाढीसाठी एकमेकांना सहकार्य करण्याचे आश्वासन या वेळी देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

Paranda Assembly Election : महाराष्ट्राच्या विधानसभेमधून निधी आणण्यासाठी धमक लागते - प्रा. डॉ. तानाजी सावंत

Parli Assembly constituency 2024 : परळी विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच: ना सभा,ना रँली गाठीभेटीने संपला परळी विधानसभेचा प्रचार

SCROLL FOR NEXT