Panchgavya bath by children and give Health promotion  esakal
नाशिक

नाशिक : चिमुकल्यांचे पंचगव्य स्नानातून आरोग्य संवर्धन

विनोद बेदरकर

नाशिक : आधुनिक काळात साबणापासून तर परफ्युमपर्यंत नानाविध साधनांची रेलचेल असतांना, अशा धकाधकीच्या जिवनात शरीर सौंदर्याची (Lifestyle) जोपासण्यासाठी उटणे, साबणापासून नानाविध सुवासिक शांपू आणि फरर्फ्युम्स पर्यंतचे मोठ जग आहे. मात्र अशाही आधुनिक काळात पारंपारीक जीवनशैली हीच श्रेष्ठ असल्याचे मानून तसे आरोग्य संवर्धन करणारा एक वर्ग आहे. त्यात विशषत: लहान मुलांचा समावेश आहे.

आरोग्य संवर्धनाचे जग

शरीरशास्त्र हा मोठा रंजक विषय आहे. शरीराची हौस पुरविण्यासाठी अनादी काळापासून नाक, कानाला वेदनादायी छिद्र पाडण्यापासून तर अंगावर गोंदण आणि अलिकडे टॅट्यु काढण्यापर्यंत कला जोपासल्या जात आहेत.

आधुनिक काळात शरीर स्वच्छतेसाठी साबणापासून तर विविध प्रकारच्या शांपू आणि परफ्युम पर्यंत नानाविध साहित्य उपलब्ध आहे. आधुनिक लाईफ स्टाईलच्या युगातील नवनवीन साधन नाकारुन पारंपारिक जीवनशैलीने शरीर स्वच्छता व संवर्धन करणारा एक वर्ग आहे. विशेष म्हणजे यात नवीन पिढीतील चिमुरड्यांचा समावेश आहे. गोदावरी तिरावर भल्या पहाटे पारंपारीक पंचगव्य चिकित्सा पध्दतीचा अंगीकार करीत हे चिमुरडे आरोग्य संवर्धनाचा अभ्यास करतात. हे चिमुरडे रोज भल्या पहाटे शहरापासून दूर गोदावरी काठी पारंपारिक आरोग्यशास्त्रातील पंचगव्य स्नानातून आरोग्य संवर्धनाची साधना करतात. नाशिकच्या गोदातिरी दत्तधाम परिवारातील साठ ते सत्तर विद्यार्थ्यांची ही दैनंदिनी आहे.

काय आहे संकल्पना

रोज पहाटे गोदावरीच्या वाहत्या पाण्यात अंगाला माती, गोमय यासह पारंपारीक शास्त्रातील उल्लेख असलेल्या चीजवस्तू अंगाला लावून ते शरीर स्वच्छ करतात. नदीच्या वाहत्या पाण्यात शरीर बुडवित त्यातून शरीर स्‍वच्छ करतात. माती, गोमय या पारंपारीक चीजवस्तू या नैसर्गिक असून त्यात नदीचे कुठलेही प्रदूषण न होता उलट नदीच्या आरोग्य संवर्धनासाठी उपयुक्त घटक असल्याचे हे अभ्यासक मानतात. साबण-शांपूसह तत्सम वस्तूतील रासायनिक घटकामुळे नदीच्या पाण्यातील जीवजंतूना इजा होते पण पारंपारीक माती, गोमयसह तत्सम नैसर्गिक वस्तूमुळे मात्र स्वत: सोबत नदीचे आरोग्य जपले जाते असा या समूहातील घटकाचा दावा आहे.

पाण्याला असतात स्मृती

पाण्याला स्मृती असतात. फ्रान्सचे शास्त्रज्ञ बेन वेनीस (Ben Venice) यांनी ‘वॉटर मेमरी‘ (Water memory) या संशोधनातून ते जगापुढे आणले. पंचगव्य स्नानामागे हीच संकल्पना असल्याचे या क्षेत्रातील निर्सग चिकित्सा अभ्यासक मानतात. या संकल्पनेवर आधारीत पंचगव्य चिकित्सेचा भाग म्हणून दत्तधाम परिवारातील अभ्यासक विद्यार्थी रोज पहाटे वाहत्या गोदावरीच्या पाण्यात पंचगव्य स्नान करतात. दत्तधाम परिवारातील साठ ते सत्तर विद्यार्थी रोज नित्यनेमाने गोदागाठावर भल्या पहाटे माती, गोमय आणि इतर प्राचीन चिकित्सेतून पंचगव्य स्नान करुन शुचिर्भूत होत साधना करतात.

''वाहत्या पाण्यात पॉझिटीव्ह आयर्न (Positive iron) मोठ्या प्रमाणावर असतात. वाहत्या पाण्यात शरीर बुडविल्यानंतर शरीरावरील मळासोबत नकारात्मक प्रभाव काढण्यास मदत होते. स्थिर पाण्यातील स्नान आणि वाहत्या पाण्यातील स्नानात त्यामुळेच फरक असतो. वाहत्या पाण्यातील स्नानाने पेशींचे अंतर कमी होते. आरोग्य संवर्धनासाठी ते म्हणून उपयुक्त तसेच केमिकल विरहित व पर्यावरणपूरक असते.'' - प्रशांत काशीनाथ गिते (पंचगव्य चिकित्सा अभ्यासक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT