On the third Shravan Monday, the ongoing pooja at Sri Kapaleshwar Mahadev Temple esakal
नाशिक

Nashik Kapaleshwar Temple : कपालेश्‍वरी रंगला पंचमुखी महादेव पालखी सोहळा; ‘बम..बम..भोले’च्या गजराने परिसर दणाणला

सकाळ वृत्तसेवा

Nashik Kapaleshwar Temple : कपालेश्‍वर महादेव देवस्थानतर्फे काढण्यात आलेल्या पंचमुखी पालखी सोहळ्यास सोमवारी (ता. ४) दुपारी चार वाजता शिवभक्तांच्या उत्साहात मंगलमय वातावरणात व ढोलताशांच्या गजरात प्रारंभ झाला.

सोहळ्याचे वाटते स्वागत कमानी, सुबक रांगोळ्यांनी स्वागत करण्यात आले. रामतीर्थातील अभिषेक पूजाविधीनंतर रात्री उशिरा सोहळ्याची समाप्ती झाली. ‘बम..बम..भोले’च्या गजराने परिसर दणाणून गेला होता.

श्री कपालेश्‍वर महादेव देवस्थानतर्फे दर सोमवारी पंचवटी परिसरात पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. (Panchmukhi Mahadev Palki ceremony at Kapaleshwar temple nashik news)

याशिवाय महाशिवरात्र व श्रावण महिन्यातील चारही सोमवारी श्रींच्या पंचमुखी मुखवट्याची सवाद्य पालखी आयोजित केली जाते. त्यानुसार दुपारी साडेचार वाजता पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला.

कपालेश्‍वर मंदिरापासून निघालेली पालखी पुढे मालवीय चौक, शिवाजी चौक, सीता गुंफा देवस्थान, श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा, सरदार चौक, शनी चौकमार्गे पालखी रामतीर्थावर पोहचते. याठिकाणी श्रींचा पूजा अभिषेक विधी रंगतो. त्यानंतर रात्री उशिरा पालखी श्री कपालेश्‍वरी पोचली.

कपालेश्‍वरासारखीच अभिनव भारतजवळील श्री तीळभांडेश्‍वर महादेवाच्या पालखी सोहळ्याचे दर श्रावणी सोमवारी आयोजन केले जाते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सोमवार पेठ, तिवंधा, जुनी तांबट आळी, भद्रकाली मार्गे हा पालखी सोहळा पुन्हा मंदिरात पोचतो. वाटेत ठिकठिकाणी सोहळ्याचे सडा रांगोळीने स्वागत केले जाते.

कपालेश्‍वर भक्तांतर्फे दर श्रावणी सोमवारी आयोजन केले जाते. नवीन आडगाव नाक्याजवळील मनकामेश्‍वर महादेव देवस्थानतर्फेही पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. हा पालखी सोहळाही रामतीर्थावर पूजेसाठी येतो.

सडा रांगोळ्यांनी स्वागत

श्रींचा पंचमुखी मुखवटा असलेल्या पालखी सोहळ्याचे वाटेत महिलांकडून सडा रांगोळीद्वारे स्वागत केले जाते. भाविकांना प्रसादाचे वाटपही केले जाते. श्री कपालेश्‍वर देवस्थानापासून दुपारी चार वाजता निघालेला पालखी सोहळा रामतीर्थातील अभ्यंग स्नानानंतर रात्री उशिरा पुन्हा मंदिरात पोचल्यावर सोहळ्याची समाप्ती झाली. या वेळी ढोलाच्या गजराने परिसर दणाणून गेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT