Panchvati Public Library esakal
नाशिक

Panchvati Public Library : गोदातीरावरील वाचन मंदिर 47 वर्षापासून सेवेत

योगेश मोरे

पंचवटी (जि. नाशिक) : काळाराम, कपालेश्‍वर, नारोशंकर, सिता गुंफा, गोराराम, गंगा गोदावरी अशी पंचवटी भागात अनेक मंदिरे आहेत. त्यामुळे नाशिक शहराची मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते. शहराची स्मार्टसिटीकडे वाटचाल सुरू आहे. पंचवटीकरांची वाचन गरज लक्षात घेता सुमारे ४७ वर्षापूर्वी परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी माजी खासदार (स्व.) ॲड. उत्तमरावजी ढिकले यांच्या संकल्पनेतून २४ मार्च १९७४ रोजी पंचवटी सार्वजनिक वाचनालय मुहूर्तमेढ रोवली गेली. (Panchvati Public Library Reading temple on Godaghat in service since 47 years Nashik News)

काही वर्षांपूर्वी पंचवटीत वाचनालय नव्हते. त्यामुळे माजी खासदार (स्व.) उत्तमराव ढिकले यांनी १९७४ मध्ये वाचनालय स्थापनेचा निर्णय घेत शनी चौकातील एका छोट्याशा जागेत सुरवात केली. वर्षभरात वाचकांचा प्रतिसाद बघता, हे वाचनालय गायरान ट्रस्टच्या जागेत हलविण्यात आले. अल्पावधीतच वाचनालयाचा नावलौकिक वाढला.

वाचनालय ग्रंथांनी समृद्ध झाले. वाचकांचे हीत जोपासत विविध उपक्रम राबविले जाऊ लागले. परंतु यात मात्र जागेची निकड निर्माण झाली. कार्यकारी मंडळाच्या अथक प्रयत्नातून व माजी खासदार (स्व.) उत्तमराव ढिकले यांच्या निधीतून महापालिकेच्या माध्यमातून इंद्रकुंड समोरील जागेत दोन मजली इमारत तयार करून वाचनालय स्थलांतरित करण्यात आले.

माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते २००२ मध्ये लोकार्पण झाला. त्यानंतर २००९ व २०१० मध्ये माजी नगरसेवक उल्हास धनवटे यांच्या निधीतून अभ्यासिका सुरू करण्यात आली. आजमितीस पंचवटी वाचनालय व अभ्यासिका मोठ्या दिमाखात उभी आहे. वर्धापन दिनानिमित्त नागरिक गौरव सोहळा, व्याख्यानमाला, गुणवंत शिक्षक गौरव, विविध स्पर्धा, ग्रंथप्रदर्शन व मान्यवरांची जयंती व पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम होतात.

वाचनालयाची वैशिष्ट्ये

सभासद - ४९० (मासिक, वार्षिक, आजीवन, बालसभासद), ग्रंथ संख्या - २५०० ते ३०००, संदर्भग्रंथ - ७५०, कादंबऱ्या - १३८०४, कवितासंग्रह - ९००, नाटक - १०००, माहितीपर पुस्तके - १५५५, ऐतिहासिक पुस्तके - ३००, चरित्र- २०००, आध्यात्मिक - २४०० विविध पुस्तके २५०० असे एकूण २८२०९ पुस्तके आहेत. तसेच, वाचनालयात दैनंदिन दैनिके - १६, साप्ताहिके व मासिके -३० आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT