Pandit Dindayal Upadhyay Maharojgar Melawa esakal
नाशिक

Pandit Dindayal Upadhyay Maharojgar Melawa: नागपूरच्या रोजगार मेळाव्‍यात सहभागाचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या उपस्‍थितीत ९ व १० डिसेंबरला नागपूर येथे रोजगार मेळावा आयोजित केला आहे. पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्‍यात सुशिक्षित बेरोजगारांनी सहभागी होऊन रोजगाराच्‍या संधी साधाव्‍यात, असे आवाहन केले आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत हा महारोजगार मेळावा आयोजित केला आहे. नागपूरच्‍या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील जमनालाल बजाज भवन येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा होणार आहे. (Pandit Dindayal Upadhyay Maharojgar Melawa Call for participation in Nagpurs employment fair nashik)

मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या/नियोक्ते मुलाखती घेणार आहेत. कार्यक्रमाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्‍थित राहातील.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी सेवायोजन नोंदणीसाठी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. भरती इच्छुक नियोक्त्यांनी रिक्तपदे याच संकेतस्‍थळावर नोंदविण्याचे आवाहनदेखील केले आहे.

अधिक माहितीसाठी त्र्यंबक रोडवरील सातपूर आयटीआय आवारातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राला संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्‍त अनिसा तडवी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT