Pandit Pradeep Mishra. In the second photograph, MP Shrikant Shinde expressing his feelings. Guardian Minister Dada Bhuse, MLA Seema Hire, Saroj Ahire, Bhausaheb Chaudhary, Ajay Boraste, Bunty Tidme, Amol Jadhav, Chandrakant Khode etc. esakal
नाशिक

Maha Shiv Puran Katha: मुलांवर अपेक्षांचा दबाव टाकू नका : पंडित प्रदीप मिश्रा

मुलांना आम्ही आहोत हा विश्वास अन्‌ भक्तीरुपी शक्ती द्या

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर : शिक्षण घेणाऱ्या मुलांवर पालकांचा यश मिळविण्यासाठीचा आणि अपेक्षांचा मोठा दबाव आहे. हा दबाव ते सहन करू शकत नाहीत. त्यामुळे दुर्दैवाने ते आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात.

हे टाळायचे असेल तर मुलांना मानसिक ताण न देता त्यांना ‘आम्ही आहोत’ हा विश्वास आणि भक्तीरुपी शक्तीचे संस्कार द्या, असे आवाहन पंडित प्रदीप मिश्रा यांनी पाथर्डी परिसरात आयोजित श्री शिवमहापुराण कथेच्या चौथ्या दिवशी उपस्थित लाखो भाविकांना केले.

आज देखील वाढवलेला मंडप कमी पडल्याने व्यासपीठाच्या अगदी मागच्या बाजूस एलईडी स्क्रीन लावून भाविकांची सोय करण्यात आली. (Pandit Pradeep Mishra statement at Maha Shiv Puran Katha Dont pressure children with expectations nashik)

जागा अपुरी पडल्याने व्यासपीठाच्या मागे एलईडी स्क्रीनवर कथा ऐकताना भाविक.

पंडित मिश्रा म्हणाले, की मुलांनो, चिंता करू नका. प्रामाणिकपणे मेहनत करा. देवाला हृदयात ठेवा आणि आपल्या कर्मावर, तसेच भक्तीवर श्रद्धा असू द्या.

युवतींनो, सनातन धर्माचा अभिमान बाळगा, क्षणिक सुंदरता आणि इतर भूलथापांना बळी न पडता आई-वडिलांच्या इच्छेने विवाह करा. सनातन धर्म टिकविण्यासाठी सनातनींनी आता जागे होण्याची गरज आहे.

अन्यथा गावोगावी होणारे सत्संग आणि कथा कार्यक्रमदेखील करणे शक्य होणार नाही. माझी सर्व साधू, संत, महामंडलेश्वर आणि धर्मातील सर्व मान्यवरांना विनंती आहे, जो सनातन धर्माचा विचार पुढे नेत आहे त्याला रोखू नका.

आपापसांत भांडण न करता धर्म कसा वाढेल, याचा प्रयत्न झाला पाहिजे. जीवनातील सर्वांत मोठे सुख भक्तीमध्ये आहे. गायीची आणि आई-वडिलांची सेवा करा. जो निवांत झोपतो तो जगातला सर्वांत श्रीमंत आहे.

परिवाराला सांभाळा. मुलांना भक्तीचा मार्ग दाखविला तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ते सबल होतील. त्यांना धर्माचे संस्कार द्या. त्यामुळे धर्माचे देखील रक्षण होईल.

शनिवारी (ता. २५) कथेचा शेवटचा दिवस असून, सकाळी आठ ते अकरादरम्यान कथा होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पालकमंत्री दादा भुसे आणि अविष्कार भुसे यांच्यासह संयोजकांचे आणि भाविकांचे देखील त्यांनी आभार मानले.

शिव कथा म्हणजे धर्मकार्य

शिवसेना शिंदे गटाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज येथे भेट दिली. पंडित मिश्रा यांनी त्यांचे स्वागत केले. खासदार शिंदे यांनी शिव कथा म्हणजे धर्मकार्य असून, हिंदू संस्कृती आणि संस्कार वाढण्यासाठी गरजेचे आहे, असे सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील आपणास शुभेच्छा दिल्या असून, माझ्या लोकसभा मतदारसंघात देखील आपण कथेसाठी वेळ द्यावा, अशी विनंती केली.

पालकमंत्री दादा भुसे, आमदार सीमा हिरे, आमदार सरोज आहिरे, भाऊसाहेब चौधरी, अजय बोरस्ते, बंटी तिदमे, राजू लवटे, अविष्कार भुसे, अमोल जाधव, सुदाम डेमसे, भगवान दोंदे, चंद्रकांत खोडे, सोमनाथ बोराडे आदी या वेळी उपस्थित होते.

कथेदरम्यान स्वतःसह प्रभागातील नागरिकांना मिळालेल्या वागणुकीमुळे नाराज झालेल्या शिंदे गटाचे स्थानिक माजी नगरसेवक सुदाम डेमसे, अमोल जाधव, भाजपचे भगवान दोंदे आणि राष्ट्रवादीचे सोमनाथ बोराडे यांची अजय बोरस्ते आणि अविष्कार भुसे यांनी घरी भेट घेत त्यांची नाराजी दूर केली.

त्यांना पंडित मिश्रा यांचे स्वागत करण्याचा मान देण्यात आला. तर प्रभाग क्रमांक ३१ मधील नागरिकांना शनिवारच्या कथेसाठी स्वतंत्र जागा देखील उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT