Maha Shiv Puran Katha: आपल्या संस्कारांमध्ये देवदेवतांच्या पूजनाचे विविध मार्ग आहेत. नदी, तलाव, विहिरी, पाणी आणि वृक्ष वाचवणे हा देखील पूजनाचाच एक मार्ग असल्याने या सर्व बाबींचे रक्षण करू, अशी संकल्परूपी दक्षिणा मला द्या, असे आवाहन पंडित प्रदीप मिश्रा यांनी पाथर्डी येथे केले.
२१ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या देवदीपावली श्री शिवमहापुराण कथेचा शनिवारी (ता. २५) सकाळी समारोप करताना ते विक्रमी संख्येने उपस्थित असलेल्या सुमारे पाच लाख भाविकांना मार्गदर्शन करत होते. पंडित मिश्रा म्हणाले, की नाशिककरांनो, निर्माल्य रथ तयार करा. निर्माल्य नदीपात्रात जाता कामा नये. नदी दूषित करू नका. ( Pandit Pradeep Mishra statement Dakshina for me is resolution of Godavari cleanliness nashik news)
एक दिवस गोदाघाटावर जाऊन तेथे स्वच्छता करेल, असा संकल्प करा. जल हे जीवन आहे, हे लक्षात ठेवा. सर्वस्व गेले तरी दुःखी होऊ नका. पुन्हा संघर्ष करा. मेहनत करा. त्याला महादेवाच्या भक्तीची जोड द्या, यश नक्की मिळेल. कोणत्याही परिस्थितीत वाम मार्गाला जाऊ नका आणि भक्तीचे संस्कार सोडू नका. जीवनात संघर्ष असेल तर चांगले फळदेखील नक्कीच मिळेल. आत्म तृप्तीसाठी परमेश्वराची कथा ऐकली पाहिजे. माता-पितापेक्षा आपल्यासाठी लकी चेहरा कुणाचाच नाही त्यामुळे त्यांची सेवा करा.
सासू आणि सून तुम्ही जशा असाल तशा एकमेकाला स्वीकारा. शरीराला झेपेल एवढेच व्रतवैकल्य करा. नाशिकमध्ये असलेले कपालेश्वर महादेवाचे मंदिर हे भारतातील कालभैरवचे शिवलिंग रूपात असणारे एकमेव मंदिर आहे. महादेवाला ओळखण्यासाठी आपले नेत्र श्रेष्ठ हवेत. भक्तांमुळेच भगवान आहे. त्याच्याविना तोदेखील कुणीही नाही. प्रगतीचा एक मार्ग बंद झाला तर तो नक्कीच दुसरा उघडतो. त्याच्यामुळे त्याच्यावरची श्रद्धा ढळू देऊ नका. महादेवाच्या जवळ गेल्यावर आतली ऊर्जा जागृत होते. जीवनात प्रसन्नता मिळविण्यासाठी सतत हसत राहा. सर्व प्रकारच्या नशांपासून दूर राहा.
नशा करायचीच असेल तर जनमानसाची सेवा करण्याची नशा करा आणि कोणत्याही परिस्थितीत धर्मांतर करू नका, असे आवाहन त्यांनी कथेच्या शेवटी केले. नाशिककर जनता, सर्व प्रशासन यांच्यासह त्यांनी पालकमंत्री दादा भुसे, अविष्कार भुसे यांच्यासह अजय बोरस्ते, रामराव पाटील, उदय सांगळे, गणेश गिते, अंकुश पवार, रंजन ठाकरे, प्रशांत जाधव, लक्ष्मण सावजी आदींचे आभार मानले. स्वच्छता, आरोग्य, पाणी, भजन आदी सेवा पुरवणाऱ्या सेवेकऱ्यांच्या हातून समारोपाची आरती करण्यात आली.
पाथर्डी पंचक्रोशीतर्फे स्थानिक माजी नगरसेवक सुदाम डेमसे, अमोल जाधव, भगवान दोंदे, सोमनाथ बोराडे यांनी सर्व भाविकांचे आभार मानले.
भाविक अन् त्यांच्या वाहनांनी रस्ते फुल
मैदानात शनिवारी प्रचंड गर्दी होती. पहाटे पाचपासून भाविकांची मैदानाकडे रीघ लागली होती. अकराला कथा संपल्यानंतर दोन तास देवळाली- पाथर्डी रस्ता, इंदिरानगरचा वडाळा- पाथर्डी रस्ता, वासननगर, समर्थनगर, इंदिरानगर, राजीवनगर आदी भागातील कॉलनी रस्ते भाविकांनी आणि त्यांच्या वाहनांनी फुल झाले होते.
वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांची मोठी दमछाक झाली. कथा सुरू असतानाच अत्यवस्थ झालेल्या एका रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला लाखो भाविकांनी अवघ्या एका मिनिटात रस्ता मोकळा करून दिला. पाच दिवसांत तीन हजार १७ भाविकांना आरोग्यसेवा पुरविण्यात आली. ४७२ जणांनी रक्तदान केले. सुमारे तीन लाख भाविकांनी भोजनाचा लाभ घेतला. भाजप नेते लक्ष्मण सावजी, आर. डी. धोंगडे, संजय नवले, रॅम बडगुजर आणि टीमने ही जबाबदारी पार पडली.
कुंभमेळ्यासाठी येण्याचे पंडित मिश्रांना आमंत्रण
कथेचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री दादा भुसे यांनी पंडित मिश्रा, सर्व प्रशासनाचे, स्वयंसेवकांचे आणि शहरवासीयांचे आभार मानत काही त्रुटी राहिल्या असतील तर जाहीर माफी मागितली. लाखो भाविकांना हात वर करून त्यांनी ‘आजपासून तंबाखू, गुटखा, विडी, सिगारेट, दारू आदी सेवन करणार नाही. व्यसनापासून आम्ही दूर राहू आणि प्रत्येक जण पाच जणांचे व्यसन दूर करू, हा संकल्प करत आहोत’, अशी शपथ दिली. २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी येण्याचे त्यांनी पंडित मिश्रा यांना आमंत्रण दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.