election  esakal
नाशिक

Market Committee Election : येवल्यात बाजार समितीसाठी पॅनल ठरेना! विक्रमी अर्जांमुळे 3 पॅनलची चिन्हे

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : येथील बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अद्याप नेत्यांत एकमत होत नसल्याने पॅनल निर्मितीला मुहूर्त मिळलेला नाही. मात्र, इच्छुकांची भाऊगर्दी होऊन आज अखेर १८ जागांसाठी तब्बल २१७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, भाजप, शिवसेना शिंदे गटातर्फे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून पॅनलची घोषणा अद्याप एकाही राजकीय पक्षांनी केलेली नसल्याने कुठला उमेदवार कुठल्या पॅनलकडून उमेदवारी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (panel for market committee not decided 3 panel signs due to record applications yeola nashik news)

बाजार समितीसाठी आज अखेर सोसायटी गटात १८४०, ग्रामपंचायत गटात ८३४, हमाल मापारी गटात ३५३, व्यापारी गटात ४२३ असे एकूण ३ हजार ४५० मतदार मतदार आहेत. यात सोसायटी गटात ९१, महिला राखीव गात ८, आर्थिक दुर्बल जागेसाठी १०, भटक्या विमुक्त एका जागेसाठी १८ ,

अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी ११, ग्रामपंचायत गटात ६२, व्यापारी गटात ११ व हमाल मापारी गटासाठी १३ अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले, बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारे यांनी दिली आहे. १८ जागांसाठी तब्बल ३४१ उमेदवारी अर्जाची विक्री झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज मोठी गर्दी उसळली होती.

बाजार समितीच्या सत्ताकारणाचा फायदा सहकाराच्या माध्यमातून होत असल्याने तालुक्यातील इतर मोठ्या निवडणुकांसाठी येथील सत्तेचा फायदाही होत आला आहे. त्यामुळे बाजार समिती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी नक्कीच सर्वच राजकीय पक्ष शर्तीचे प्रयत्न करू लागले आहेत.

सध्या सर्वच राजकीय पक्षाच्या व त्यात स्थानिक नेत्यांच्या समर्थकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, माजी आमदार मारोतराव पवार, सहकार नेते अंबादास बनकर, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष ॲड. माणिकराव शिंदे यांच्या निर्णयाकडे सर्वांचेच पॅनल बनविण्याच्या हेतूने लक्ष लागले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी येथे येऊन आमदार नरेंद्र दराडे व युवा नेते संभाजी पवार यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांची बैठक घेतली. सन्मानजनक जागा दिल्यासच महाविकास आघाडी करून बाजार समिती निवडणूक लढवू अशी भूमिका जाहीर केल्याने आता पुढील घडामोडीकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

ज्येष्ठ नेते ॲड. माणिकराव शिंदे आणि भाजप एकत्रित पॅनल बनवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. इच्छुकांची संख्या वाढल्याने विक्रमी अर्ज दाखल झाले असल्याने व अनेक मातब्बरानी अर्ज दाखल केल्याने कोण रिंगणात राहणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीसाठी खैरे ठाण मांडून

उमेदवारी फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने भुजबळ संपर्क कार्यालयातून सूत्रे हलविण्यात येत होती. सुरुवातीपासूनच बाजार समिती निवडणुकीची रणनीती ठरवण्यात पुढाकार घेतलेले भुजबळांचे शिलेदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी दिवसभर ठाण मांडून होते.

ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, भुजबळ संपर्क कार्यालयाचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष वसंतराव पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, ज्ञानेश्वर शेवाळे आदींसह पदाधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT