Pankaj Parakh esakal
नाशिक

Parakh Case : पोलिस तपासात संशयित Goldman पारखचे असहकार्य

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येवल्यातील (कै.) सुभाषचंद्र पारख नागरी पतसंस्थेच्या अपहारप्रकरणी अटकेत असलेला संस्थापक संचालक पंकज पारख पोलिसांना (Police) तपासात सहकार्य करीत नसल्याचे समोर आले आहे. (pankaj parakh not responding to police investigation in parakh Embezzlement of credit institutions case nashik news)

तसेच, पारख याने खरेदी केलेला गोल्ड शर्टबाबतही कोणतीही माहिती देत नसल्याने पोलिसांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान, न्यायालयाने पारख याच्या पोलिस कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

येवल्याचे माजी नगराध्यक्ष व (कै.) सुभाषचंद्र पारख पतसंस्थेचा संस्थापक अध्यक्ष पंकज पारख यास नाशिक ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकच्या अनमोल नयनताराच्या पार्किंगमधून अटक केली होती.

पारख याच्या दहा दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यास पुन्हा जिल्हा न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची कोठडी सुनावली. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्या पथकाने पारख यांच्या घराची झडती घेत त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेचे कागदपत्रे जप्त केली आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पारख त्याने काही वर्षांपूर्वी घेतलेल्या सोन्याचा शर्टचाही पोलिस शोध घेत आहेत. तर, पारख याने तो शर्ट विक्री केल्याचे तपासात पुढे आले आहे. मात्र, त्याने विक्री कोणाला, कधी, किती किमतीत केली याबाबत माहिती नाही. या शर्टाची सद्यःस्थितीत दीड कोटी रुपयांच्या घरात किंमत आहे.

तसेच, सदरील कारवाईत पोलिसांना फारसे सहकार्य पारख करीत नसल्याचेही समजते. यासंदर्भातही न्यायालयात दावा करण्यात आला. कर्जाबाबत ९३ कागदपत्रे पारखने लपवल्याचा अंदाज आहे. त्याचा शोध आर्थिक गुन्हे शाखा घेत असल्याने या तपासासासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत पारखच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

किडनी निकामी

पारख याच्यासह अध्यक्ष योगेश सोनी, व्यवस्थापक अजय जैन आणि चार वसुली अधिकाऱ्यांसह दहा संचालकांवर गुन्हा दाखल आहे. पारख याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता, जिल्हा रुग्णालय आणि संदर्भ सेवा रुग्णालयात तपासणीनंतर, त्याची एक किडनी यापूर्वीच निकामी झाल्याचे पोलिस तपासात समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT